मुंबई,दि.०७ : -झुंजारनामा ऑनलाईन – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दि. १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पार पडले होते. या अधिवेशनात सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर सन २०२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जून २०२४ पासून होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनऐवजी २७ जूनपासून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.