पुणे,दि.२४ :- पिझ्झाची डिलिव्हरी उशीरा घेऊन आल्याचा मणात राग धरून चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराजवळील घडला.
चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये डिलिव्हरी बॉय चे काम करतात. मंगळवारी रात्री उशिरा चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता.
पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा डिलिव्हरी घेऊन गेल्यान दोघामध्ये वाद झाले. पडवळ याने रोहितला मारण केली. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्टल काढून हवेत फायरिंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद ठाण्यात जीवितास धोका निर्माण होईल असा प्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे