पिंपरी चिंचवड,दि.२०:- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई यांच्या २६२ रिक्त पदांसाठी कालपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्रातून १५ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो उमेदवार पिंपरी- चिंचवड शहरात दाखल झाले आहेत. परंतु, पहिल्या दिवशी तरुणांना मिळेल त्या ठिकाणी झोपून काढावे लागले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बाहेर गावावरून आलेल्या परीक्षार्थींना भोसरी गवळी माथा (भोसरी- निगडी रोड) येथील बालनगरी येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक 19 जून 2024 रोजी पहाटे चार वाजेपासून मैदानी चाचणी सुरू करण्यात आलेली असून 500 उमेदवार बोलविण्यात आलेले होते. त्यापैकी 281 उमेदवार हजर होते आणि 225 उमेदवार मैदानी चाचणी पूर्ण केलेली आहे..अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिली आहे.