• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ परिषदेचे आयोजन

राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करणार-अमिताभ गुप्ता

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
19/06/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Img 20240619 Wa0129
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. १९ : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) व इंडीयन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय ‘चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे 19 ते 21 जून या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यासह महिला बंदिवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले.

या प्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, इंडियन ऑईलच्या संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, फिडेच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग व फिडे प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

‘परिवर्तन प्रिझन टू प्राईड-नई दिशा’ या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदिवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याचा आनंद व्यक्त करुन श्री.गुप्ता म्हणाले, कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. सुवर्णपदक प्राप्त बंदीवानांना शिक्षेत विशेष माफी देवून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

मागील वर्षी एक प्रयत्न म्हणून येरवडा कारागृहात बंदिवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरूवात केल्यानंतर एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बंदिवानांनी चांगली तयारी करून मागच्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेल. बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते या कारागृहातील बंदीवान खेळाडूंनी करून दाखविले. सध्या येरवडा कारागृहात महिला व पुरूष असे 200 बंदी बुद्धिबळ शिकत आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती गोविल म्हणाल्या, बुद्धिबळामुळे बुद्धीला चांगली चालना मिळते व परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जाण्याचे कौशल्य निर्माण होते. त्यामुळे बंदिवानांना भविष्यात याचा लाभ होईल.

विविध देशांतील कारागृहांतील बंदिवानांना बुद्धिबळ या खेळामध्ये प्रशिक्षण देवून विविध देशांतील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून बंदीवानांमध्ये तुरूंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यातही काही कौशल्ये आहेत ज्याआधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू असा आत्मविश्वासही निर्माण होऊ शकणार आहे, अशी माहिती उद्घाटनप्रसंगी देण्यात आली.

Previous Post

सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली पुण्यात राजरोस डी.जे.च्या तालावर अश्लील नृत्य

Next Post

कौतुकास्पद! पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस शिपाई भरतीसाठी आलेल्या तरुणांची पोलिसांनी केली राहण्याची सोय

Next Post
Img 20240620 Wa0110

कौतुकास्पद! पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस शिपाई भरतीसाठी आलेल्या तरुणांची पोलिसांनी केली राहण्याची सोय

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist