पुणे.दि.६:- पुण्यातील औंध परिसरात दिनांक २८/०६/२०२५ रोजी ००/३० वा चे सुमारास विधाते वस्ती, औंध, पुणे याठिकाणी फिर्यादी व त्यांचे मित्र हे गप्पा मारत असताना त्याठिकाणी १२ ते १५ आरोपींनी हातामध्ये लाकडी दांडके व हत्यारे घेवुन येवुन त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवत सदर भागात दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्रांना हत्याराने व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. सदरबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नमूद गुन्हयामधील आरोपींचा. वरिष्ठ मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना सपोनि नरेंद्र पाटील, सपोनि अनिकेत पोटे व तपास पथकामधील अंमलदार यांनी आरोपींची माहिती प्राप्त करून मुळशी भागामधून आरोपी नामे १) प्रतीक सुनिल कदम, वय-२६ वर्ष, रा-कस्तुरबा गांधी वसाहत, औंध, पुणे, २) अमीर अल्लाउददीन शेख, वय-२८ वर्ष, रा- कस्तुरबा गांधी वसाहत, औंध, पुणे, ३) अतुल श्याम चव्हाण, वय-२७ वर्ष, रा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, डी. पी. रोड, औंध, ४) रॉबीन दिनेश साळवे, वय-२६ वर्ष, रा-फ्लॅट नं.०७, अजिंक्य ०१, दर्शनपार्क, डी.पी. रोड, औंध, पुणे, ५) समीर अल्लाउददीन शेख, वय-२६ वर्ष, रा- कस्तुरबा गांधी वसाहत, औंध, पुणे, ६) जय सुनिल चेंगट, वय-२१ वर्ष, रा-कस्तुरबा गांधी वसाहत, जुनवणे शाळेसमोर, औंध, पुणे व ७) अभिषेक अरुण आवळे, वय-२४ वर्ष, रा-कस्तुरबा गांधी वसाहत, मारुती मंदिराजवळ, औंध, पुणे यांना दिनांक ०१/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींकडुन एकुण ०७,६०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये एक गावठी कट्टा, तीन कोयते व एक चारचाकी गाडी, दोन मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असुन त्यांचेवर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे वेगेवेगेळे गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि-४, पुणे शहर, . सोमय मुंडे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर. हिंमत जाधव,. सहा पोलीस आयुक्त, येरवडा विभाग अति कार्यभार खडकी विभाग, पुणे शहर