पुणे दि. ०१:- १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कॉंग्रेस भवन येथे कॉंग्रेस सेवादलाच्या वतीने झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. या आधी हुतात्मा दाभाडे, महात्मा गांधी व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले. झेंडावंदन पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता पार पडले. यावेळी लोकसभेचे उमेदवार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अध्यक्ष अभयजी छाजेड तसेच कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी अध्यक्ष रमेश बागवे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले.झेंडावंदन पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष भाई हरिदास अडसूळ यांनी घेतले. भाई सुरेशजी उकिरडे, अस्लमजी बागवान, संजयजी शेजवळ, शैलेश गायगोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी सेवादल भाई व ताईंनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.झेंडावंदन नंतर सेवादल कार्यालयात सेवादल अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या कामाचा आढावा तसेच झेंडावंदन घेण्याबाबत ताई व भाईंच्या अडचणी सोडवणे बाबत मिटींग घेण्यात आली