पुणे दि,०१ : – पुणे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी १ मे रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी ८०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची यासाठी निवड केली जाते. यावर्षी पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई पदावर कार्यरत असणारे संतोष विठ्ठल जगताप यांना सतत १५ वर्षे सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते जगताप यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
संतोष जगताप सध्या पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. १ जुलै १९९४ रोजी पोलीस दलात भरती झालेले संतोष जगताप यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास केला आहे. यामध्ये १५ गंभीर गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. जगताप यांनी आपल्या सेवाकाळामध्ये गँगवॉर मधील कुख्यात गुन्हेगार, खुन, दरोडा, चोरी, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींची कौशल्याने माहितीकाढून आरोपींना गजाआड केले आहे.