.पुणे,दि. 1: – 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज विधानभवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपवनसंरक्षक श्री लक्ष्मी ए., उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, उपायुक्त(महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (रोहयो) अजित पवार, नगरप्रशासन विभागाचे उपसंचालक प्रशांत खांडकेकर, अधिक्षक कृषी अधिकारी (रोहयो) विनयकुमार आवटी, सहायक वनसंरक्षक संजय मारणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.जे.सणस, उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे व मुकेश काकडे यांनीही वृक्षारोपण केले.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 5 कोटी 1 लाख 10 हजार असून विभागात 5 कोटी 57 लाख 63 हजार खड्डे खोदण्यात आले आहेत. ही मोहिम यशस्वी करण्यामध्ये ग्रामपंचायत आणि वन विभागाचा महत्वपूर्ण वाटा असणार आहे. पुणे विभागातील सर्व जिल्हयात 100 टक्के काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वारी मार्गावर आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. श्री लक्ष्मी ए., म्हणाल्या वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत पुणे जिल्हयात 1 कोटी 54 लाख खड्डे खोदण्यात आले आहेत. या मोहिमेमध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण या विभागांबरोबरच अन्य विभागांचाही मोलाचा वाटा आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी लोक प्रतिनिधी, एन.सी.सीचे विद्यार्थी, नागरिक यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वृक्ष लागवडीची अद्यायवात माहिती वन विभागाच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध आहे. कार्यक्रमास महसूल, वन व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.