मुंबई ०१ :- अश्विनी भरत मते यांची नगर दक्षिण, नगर शहर तालुका तसेच पारनेर तालुक्याच्या महिला संपर्क पदी नियुक्ती करण्यात आली आहे.अश्विनी भरत मते या सलग तीन पंचवार्षिक नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या मागच्या निवडणुकीत वार्ड बदली झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. परंतु दांडगा जनसंपर्क असल्या कारणाने पक्षश्रेष्ठीने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची अगोदर चांदिवली विधानसभा महिला संघटिका म्हणून नेमणूक केली आणि आपल्यावर टाकलेल्या विश्वासास सार्थ केला. तसेच त्यांनी एन वार्ड मध्ये अध्यक्ष व मुंबई महानगर पालिकेत आरोग्य समिती पद भूषविले आहे.
जीवनदायी फाऊंडेशन स्थापन केले होते त्याच्या उदघाटनाला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,गटनेत्या आशाताई बुचके उपस्थित होत्या.