पुणे दि,०२:- हॉकी पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी संघाने येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत मंगळवारी दणदणीत विजयाची नोंद केली. नेहरुनदर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हॉकी पुणे संघाने कीड्स इलेव्हनला हॉकीचे धडे देताना 19-0 असा विजय मिळविला. क्रीडा प्रबोधिनीने पिंपरी चिंचवड महापालिका इलेव्हन संघाचा 14-0 असा धुव्वा उडविला. स्पर्धेतील अन्य एका सामन्यात हॉकी लव्हर्सने राजा बांगला स्पोर्टस क्लबचा 3-0 असा विजय मिळविला.
हॉकी पुणेच्या दणदणीत विजयाचा शिल्पकार अजित सिंग ठरला. त्याने हॅट्ट्रिकसह सहा गोल केले. त्याला कर्णधार अब्दुल सलमानी आणि अरविंद कुमार यांनी प्रत्येकी तीन गोल करून सुरेख साथ केली. सामन्याचा हिरो ठरलेल्या अजितने 19, 21 आणि 23व्या मिनिटाला सलग गोल केले. त्यानंतर त्याने 26, 32 आणि 51व्या मिनिटाला आणखी तीन गोल केले. हॉकी पुणे संघाकडून तालिब शाह, कांचन राजभर यांनी प्रत्येकी दोन, अवनीश सेन, गुणेंद्र आणि सेबॅस्टियनने एकेक गोल केला. क्रीडा प्रबोधिनी संघाने पूर्वार्धात 5 आणि उत्तरार्धात 9 गोलांचा पाऊस पाडून मोठा विजय मिळविला. हरिष शिंगडी आणि रोहन पाटील यांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यांना वेंकटेश केंटे आणि धैर्यशिल जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल करून साथ केली. संतोष भर्डे, अनिकेत गुरवल, गणेस फाटील आणि राहुल शिंदे यांनी एकेक गोल केला. आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्यात दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या राजा बांगला संघाला हॉकी लव्हर्स संघाने 3-0 असे सहज हरवले. प्रणय गरसुंड, आकाश बेलिटकर, हर्ष मुथय्या यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
निकाल
हॉकी लव्हर्स 3 (प्रणय गरसंड 14, आकाश बेलिटकर 26, हर्ष मुथय्या 51वे मिनिट) वि.वि. राजा बांगला स्पोर्टस क्लब 0 मध्यंतर 2-0
क्रीडा प्रबोधिनी 14 (संतोष भर्डे 14, हर्ष शिंगडी 16, 48, 52वे, अनिकेत गुरव 19वे, गणेश पाटिल 22, रोहन पाटिल 24, 41, 43वे, राहुल शिंदे 36, वेंकटेश केंचे 45, 50वे, धैर्यशील जाधव 55, 58वे मिनिट) वि.वि. पीसीएमसी इलेव्हन 0 मध्यंतर 5-0
हॉकी पुणे 19 (अब्दुल सलमानी 6, 10, 28वे, तालिब शाह 9. 39वे, अजित सिंग 19, 21, 23, 26, 32, 51वे, अरविंद कुमार 25, 27, 54वे, अवनिश सेन 31, गुणेंद्र 38वे, सेबॅस्टिन दास 42, कांचन राजभर 44, 50वे मिनिट) वि.वि. किड्स इलेव्हन 9 ः मध्यंतर 0-0
आजचे सामने
नारायणगाव हॉकी क्लब वि. रेल्वे पोलिस बॉईज द. 12 वा.
ग्रीन मेडोज वि. विक्रम पिल्ले अकादमी दु. 1.15 वा.
हॉकी पुणे वि. पुणे सिटी लाईन बॉईज / फ्रेंडस इलेव्हन द. 2.30 वा.
हॉकी लव्हर्स वि. रोव्हर्स अकादमी अ दु. 3.15 वा.