मुंबई दि. १३ :- “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास” या उद्देशाने विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी व दिंडीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन व्हावे हा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अभ्युदय विद्यालय शाळेने यावर्षी “दिंडी पर्यावरणाची समाजप्रबोधनाची”या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते समाजातील प्रत्येक घरात सहजतेने पोहचू शकणारे घटक म्हणजे विद्यार्थी.याच घटकाच्या माध्यमातून समाजातील वर्तमान समस्यांबाबत प्रबोधन करण्यात आले.विध्यार्थ्यांनी ज्ञानोबा-तुकोबा यांच्या जयघोषा बरोबरच झाडे लावा,झाडे जगवा.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.पाण्याचा वापर जपून करा.यासारख्या घोषणा देत सामाजिक प्रश्नांबाबत समाजाचे प्रबोधन केले.दिंडीमध्ये विठ्ठल,रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,वारकरी यांच्या हुबेहूब व्यतिरेखा साकारल्या होत्या.दिंडी सोहळा संपूर्ण पारसीवाडी मधून मार्गस्थ करण्यात आला.दिंडी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांबरोबरच अंगणवाडीचे चिमुकले बाल वारकरी तसेच पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.हे वारीचे २७ वे वर्ष होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षिणी सुस्वरे आळविती’निसर्गाची ओढ असेलच, पण मुळात माणूस नावाचा प्राणी त्या निसर्गाचाच एक अविभाज्य घटक आहे. जगभरच्या काव्यातून चित्रित झालेला रम्य निसर्ग गेल्या काही वर्षांत शहरी भागातून आटताना दिसतोय.दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न या चिमुकल्या वारकऱ्यांनी केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे.
सदर दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी अभ्युदय ज्ञानवर्धिनी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आर. जी. हूले सर, तसेच अलका हुले मॅडम, तुषार हुले सर, मुख्याध्यापक देशमुख सर,शिक्षक कर्मचारी वृंद यांनी विशेष प्रयत्न केले
बाळू राऊत प्रतिनिधी