नेवासा दि १४ :-नेवासा तालुक्यातील सोनई येथे पाण्यासाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते. विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी 18 गाव पाणीयोजना पाडली बंद
ठेकेदारास संपूर्ण बिले अदा करून पाणीयोजना कामे पूर्ण होण्याआधीच हस्तांतरणाचा घाट मांडला आहे
सोनई ,करजगावसह १८ गावातील पाणी योजना वारंवार बंद पडत असून या 18 गावांचे पाण्यावाचून हाल सोसावे लागत आहेत.
वारंवार प्रशासन व ठेकेदार यांना सूचना देऊनही पाणी योजनेत कुठल्याही प्रकारची दुरुस्ती होत नाहीय आणि योजना सुरळीत चालू होतं नाही म्हणून पाणी योजनेत समाविष्ठ असलेल्या गावकऱ्यांचा रोष अनावर होऊन सोनई,शिरेगाव ,करजगाव,तामसवाडी ,अमळनेर ,गोणेगाव, खुपटी,लांडेवाडी,खरवंडी ,खेडलेपरमानंद, पानेगाव ,वाटापुर, नविनचांदगाव, निंभारी,इमामपूर,बेल्हेकर वाडी,गणेशवाडी, गोमळवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मा, आ, शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सोनई येथे सोनई- राहुरी रोडवर रस्तारोको आंदोलन करण्यात आले सुमारे 3 तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनात सोनई,करजगावसह18 गावातील महिला,पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन थांबविण्यात आले परंतु ही पाणी योजना व्यवस्थित रित्या लेखी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रसंगी जेलभरो आंदोलन करू प्रशासनास निर्णय घेण्यास भाग पाडू असे मा, आ, शंकरराव गडाख यांनी प्रशासनास सांगितले
(प्रतिनिधी -कमलेश नवले,नेवासा)