मुंबई दि,१७ :- केंद्र शासन पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानातील अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील शिक्षकांना मिळणाऱ्या मानधनात 1500 रूपयांची वाढ करून ते 21500 करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ 1946 विशेष शिक्षकांना मिळणार आहे.अपंग समावेशित शिक्षम उपक्रमातील शिक्षकांना 2017-18 या वर्षात 21500 प्रतिमाह मानधन मिळत होते. तथापि समग्र शिक्षण सुधार आराखड्यानुसार हे मानधन वीस हजार असे कमी करण्यात आले. या शिक्षकांना त्यामुळे 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी 1500 रूपये कमी मानधन मिळाले. त्यांना पूर्ववत 21500 प्रमाणे मानधन मिळण्यासाठी प्रतिमाह 1500 रूपये इतकी फरकाची रक्कम या योजनेसाठीच्या राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी तीन कोटी 50 लाख 28 हजार इतका निधी दरवर्षी राज्य हिश्शाच्या प्रमाणाव्यतिरिक्त विभागास उपलब्ध करून देण्यात येणार आहे
बाळु राऊत मुंबई प्रतिनिधी