बोरघर / माणगांव दि,२२ :- ( विश्वास गायकवाड ) चिपळून एम आय डिसी तिल ते केमिकल अँसिट हे पोटणेर वावेदिवाळी इंदापुर येथील नदीच्या काठी पोटणेर या गावचे शेतकरी उल्हास चव्हाण याच्या सागण्या वरूण हे केमिकल त्याच्या जागेत टाकण्यात आले होते. हे अतिशय घातक व प्रदूषण युक्त केमिकल आहे.असे महाड प्रदूषण मंडळाच्या अधिकारी वर्गाने लेखी पञ देऊन माणगांव तहसिलदार यांना सागीतले असून त्या जागेचा तलाठी यानी पंचनामा देखील केला असून हे प्रकरण माणगांव पोलिस यांच्या कडेदेखिल प्रथम जाऊन सुध्दा या वाहन चालकावर किवा जागेच्या मालकावर त्यांनी अजून पर्यत कोणत्याही प्रकारे कारवाई केली गेलेली नाही. पोलिस वरिष्ठ अधिकारी याना विचारले असता हा विषय आमच्या कडे येत नाही. असे सागीतले जात आहे.तसेच हेच केमिकल याच जागेत खड्डा खोदून ते जमिन मालक याने नष्ट केले असले तरी हेच केमिकल बाहेर येऊन ते नदीच्या पाण्यात मिसलत आहे.
या प्रकरणाला काही दिवस सुध्दा झाले नसताना याच जागेत परत पोल्ट्री फार्म ची खराब अंडी तसेच मेलेल्या कोबड्या टाकून या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरवले जात आहे.ही जागा गोवा हायवे शेजारी नदीलगत असून मोठया प्रमाणात दूरगदी पसरत आहे.मोठ्या प्रमाणात खराब अंडी माणगांव तालुक्यातील मधील एका पोल्ट्रीमार्फ मधून आणली जाऊन ती या जागेत टाकली जातात ही अंडी फुटून त्यांची मोठ्या प्रमाणात दुरगंधी या परिसरात पसरत असून या जागी मोठया प्रमाणात विषारी जंतू किडे निर्माण होऊन ते नदीच्या पाण्यात मिसलत आहेत हे नदीचे पाणी पोटणेर, गंगेवाडी.रूद्रवली.वाढवण. पाणासई. इंदापुर माणगांव काळनदी ला मिळत असून या मार्ग अनेक गावाच्या पाणी पीयजळ योजना असून या दूरगधी मुले नागरीकाच्या जिवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून आता तरी माणगांव पोलीस प्रशासन या शेतक-यावर कधी कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष केंद्रित आहे.