.बोरघर / माणगांव दि २२:- ( विश्वास गायकवाड ) माणगांव नगरपंचायत व महिला बालकल्याण समिती तर्फे दिनांक २१ जुलै दुपारी ३ वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून मधुरा बाचल (मधुरा रेसिपी) या होत्या.या वेळी माणगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण, उपनगराध्यक्षा शुभांगी जाधव , महिला व बाळ कल्याण समिती सभापती रिया उभारे, महिला व बाळ कल्याण समिती उपसभापती माधुरी मोरे, नगरसेविका भाग्यश्री यादव, नगरसेविका अंजली पोवार, नगरसेविका स्नेहा दसवते, नगरसेविका सानिया शेठ, नगरसेविका नीलम महेता,नगरसेविका हर्षदा काळे
यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली होती. या पाककला स्पर्धेचा विषय सोयाबीन व खजुरयुक्त पदार्थ असा होता. या स्पर्धेमध्ये तब्बल ८६ महिला स्पर्धकांनी विशेष सहभाग घेतला होता. सोयाबीन व खजुराचे विविध नवनवीन प्रकार या स्पर्धेमार्फत माणगांवकरांना पहावयास मिळाले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्र. सौ. मृणाल मनीष शेलार, द्वितीय क्र. सौ. क्रांती सतीश बडगुजर, तृतीय क्र. सौ. गीतांलजी हनुमंत शेळके यांनी पटकाविला. तर विशेष सजावट म्हणून सौ. पूजा सुरेश कडू व पौष्टिकता म्हणून सौ. मीरा मोहन मेथा यांना पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रायगड जिल्हा अध्यक्षा आदितीताई तटकरे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.