मुंबई दि २२ :-पावसाचे दिवस आहेत जास्त पाऊस पडत असल्या कारणाने ठिकठिकाणी झाडाच्या फांदी तुटून पडत आहेत त्यामुळे या सर्व वस्तूकडे महापालिकेचे बारीक सारीक लक्ष्य आहे पण सकाळी ९:वाजताच्या सुमारास मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये वृक्ष फांद्या तोडणारे कॉन्ट्रॅक्टर चा पिकअप टेम्पों सुमारे 20 लेबर कामगांराना घेवून साकेत ब्रिज वरून नाशिक मुंबई वाहिनीवरून मुलुंडला जाणे करीता प्रवास करीत असताना चालकाने मद्यपान केले असल्या कारणे चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटुन सदर टेम्पो साकेत ब्रिजवर पलटी झाला व रस्त्याकडेच्या झाडावर आदळून अडकून पडला. सदर अपघातात 15-18 लोक जखमी झाली असून जखमींना Civil हाँस्पिटल ला उपचार कामी पाठविण्यात आले आहे.कापुरबावडी पो. स्टेशन कडून अपघाता बाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.