बोरघर / माणगांव दि २७ :- रायगड प्रेस क्लब संलग्न माणागांव प्रेस क्लब तर्फे शुक्रवार दि.२६ जुलै रोजी माणागांव तालुका प्रेस क्लबच्या वतीने माणगांव तालुक्यातील खरवली विभागातील बोरघर या गांवचे प्रगतशील शेतकरी आयु. आकाराम बळीराम गायकवाड यांना रायगड प्रेस क्लब चा सन २०१९ चा माणगांव तालुक्यातील आदर्श शेतकरी पुरस्कार माणगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार श्री. गौतम जाधव, उपाध्यक्ष पत्रकार श्री. विश्वास गायकवाड, कार्याध्यक्ष श्री. पद्माकर उभारे, खजिनदार श्री. संतोष सुतार, सहसचिव श्री. हरेश मोरे आणि पदाधिकारी तसेच खरवली तलाठी सजाचे तलाठी श्री. अमित उजगरे यांच्या हस्ते तळाशी तालुक्यातील शेतकरी श्री. सुनिल माळी यांच्या समवेत शेताच्या बांधावर जावून सन्मान पूर्वक देण्यात आला.
श्री. आकाराम बळीराम गायकवाड हे गेली चाळीस वर्षे अथकपणे शेती व्यवसाय करत आहेत. माणगांव तालुक्यातील मौजे बोरघर या गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. या मध्ये काही ठिकाणी भातशेती तर काही ठिकाणी वर्कस जमीन आहे. त्यांचे आजोबा, पंजोबा बोरघर मध्ये शेती व्यवसाय करत असत. त्यांच्या नंतर स्वतः श्री. आकाराम गायकवाड हे त्यांच्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून ते निरंतर शेतीच व्यवसाय करत आहेत. ते आपल्या शेतात प्रचंड मेहनत घेवून भात, नाचणी, वरी, हुलगे, मिरची, काकडी, भाजीपाल्याची लागवड करतात. त्याच बरोबर फळबाग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय इत्यादींच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या शेतीच्या कामात त्यांना त्यांच्या पत्नी सौ. अश्विनी आकाराम गायकवाड या नेहमी मदत करतात. शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर या देशातील सर्व जनतेची भूक भागते त्यामुळे शेती व्यवसाय कायम टिकून ठेवला पाहिजे. अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे सद्याच्या महागाईच्या काळात शेती व्यवसाय परवडत नसल्याने ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय कायमचा सोडून मुंबई गाठली आहे. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा श्री. आकाराम गायकवाड यांनी आपला शेती व्यवसाय सोडून दिलेला नाही. त्यामुळे पत्रकारिता विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा रायगड प्रेस क्लब पुरस्कृत आदर्श शेतकरी पुरस्कार २०१९ या सर्वोच्च पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. त्यांना हा मानद पुरस्कार मिळाल्याने माणगांव तालुक्यासह बोरघर गावची आणि त्या पंचक्रोशीतील तमाम शेतकऱ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच पोटणेर येथील प्रगतशील शेतकरी श्री. धोंडू पांडुरंग शिंदे यांचा सत्कार करतेवेळी पोटणेर ग्रामपंचायतीचे सरपंच बबन राम काजारे. सद्दश गुरूप्रसाद शंकर निमूणकर. सद्दश नंदिनी निलेश सावंत. ग्रामसेवक राकेश मोरे. ग्रामस्थ चंद्रकांत सावंत.अरूण खैरे.उद्योगजक उमेश साटम. स्मिता साटम.रेश्मा राजेद्र महाडीक. सचिन शिंदे इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
छाया : ( पत्रकार विश्वास गायकवाड बोरघर / माणगांव )