पुणे.दि,२७:-पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीसांनी एका मनोरुग्णास दिले त्याचे पालकांचे ताब्यात दि. २५/०७/२०१९ रोजी पोउपनि. श्री. एस.डी.दराडे हे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावरहजर असताना श्री विशाल चंद्रकांत तेलकर, रा. १०१/ श्रीरामचंद्र अपार्टमेन्ट रेनॉल्ट शोरुमचे मागे बाणेर पुणे, यांनी एक मनोरुग्ण मुलगा – हर्षल सुनिल आहेर, वय २१ वर्षे रा. मु.पो. देवळा निरंजन रोड, ता.देवळा, जि. नाशीक हा मुंबई येथे एस.वाय.बी.कॉम मध्ये शिक्षण घेत होता. परंतु तो वेडाचे भरामध्ये पुणे येथे १०१/श्री रामचंद्र अपार्टमेन्ट रेनॉल्ट शोरुमचे मागे बाणेर पुणे, येथे भरकटला होता व श्री विशाल तेलकर
यांनी पोलीस स्टेशन येथे येवुन समक्ष कळविले असता पोउपनि, दराडे व त्यांचा स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावुन सदर मुलास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचे वडील नामे – श्री सुनिल वसंत आहेर, वय ४९ वर्षे रा. देवळा नाशिक यांना त्यांचे फोनवरुन संपर्क करुन मुलगा सुखरुप असलेबाबत व
पोलीस स्टेशन येथे असलेबाबत कळविल्याने त्यांनी देवळा नाशिक येथुन येवुन त्यांचे मुलास घेवुन गेले.मुलगा सुखरुप मिळाल्याने सुनील आहेर यांनी पुणे पोलीस दलाचे आभार मानुन पोउपनि, दराडे व त्यांच्या स्टाफला धन्यवाद दिले