पुणे दि,२७ :- पुणे पोलिसांनी कासेवाडी भवानी पेठेत घरफोडी करणा-या गुन्हेगाराच्या २४ तासात आवळल्या मुसक्या अधिक माहिती अशी की, दिनांक २३/७/२०१९ रोजी ते दिनांक २४/७/२०१९ रोजी यातील फिर्यादी सिध्देश्वर श्रिधर डांगे वय ४७ वर्षे धंदा, टेम्पोचालक रा.५७६, काशेवाडी, विशाल
क्रांती तरुण मंडळाजवळ, भवानी पेठ पुणे व त्याचे सर्व कुटुंबीय जागरण गोंधळाचे कार्यक्रमासाठी ऊरळी येथे गेले व
पुणे येथे राहते घराला कुलुप लावुन गेले असतांना, कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे कुलुप
तोडुन लोखंडी कपाटाचे लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ७४, हजार ८०० रु किं चा मुद्देमाल घरफोडी करुन चोरी गेला होता खडक पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे.दाखल गुन्हयातील आरोपीचा खडक तपार पथकातील कर्मचारी हर एक प्रकारे शोध घेत होते, तेव्हा
पो,कॉ आशिष चव्हाण व पो,काँ महावीर दावणे यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, कासेवाडी भवानी
पेठ येथील घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय ऊर्फ राजा सुखदेव शिंदे रा.कासेवाडी पुणे याने केलीअसुन तो राहते घरी आलेला आहे अशी खात्रीशर माहिती मिळुन आल्याने त्यास राहते घरातुन ताब्यात घेतले, त्याचेकडे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कमे बाबत तपास करता त्याने मुद्देमाल राहते घरात लपवुन ठेवला अरल्याचे सांगितल्याने त्याचेकडुन दाखल गुन्हयात चोरीस गेलेले१) २६, हजार रुपये किं एक सोन्याची जोधळ चार पदरी मागे काळे मनी असलेली २) १३, हजार रुपये किं एक सोन्याची बोरमाळ ३) २, हजार ६०० रुपये किं एक सोन्याची नथ ४) ५, हजार ४०० रुपये किं चे दोन लहान सोन्याचे बदाम ५) ७, हजार ४०० रु किं चे कानातील एक जोड़ कर्णफुले व २० हजार रुपये रोख रक्कम असा
एकुण ७४, हजार ८००रुपये किं चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीवर यापुर्वी घरफोडीचा
गुन्हा दाखल आहे.वर नमुद सर्व कारवाई ही श्री. श्रीकांत तरवडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग
पुणे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त मंडळ १ व श्री. प्रदिप आफळे,सहा पोलीस आयुक्त
फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री.भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री.उत्तम चक्रे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी श्री.उमाजी राठोड़, सहा पोलीस निरीक्षक व
पोलीस कर्मचारी विनोद जाधव, गणेश सातपुते, महावीर दावणे, आशिष चव्हाण, राकेश क्षिरसागर, समीर
माळवदकर, बंटी कांबळे, प्रमोद नेवसे, रवी लोखंडे, इम्रान नदाफ, योगेश जाधव, विशाल जाधव, हिम्मत
होळकर, यांचे पथकाने केली आहे