मुंबई दि ०३ :- मुंबई अणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रासहीत मुंबईतही येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम तटाला येत्या 48 तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय दुपारी पावणे दोनच्या सुमारास समुद्रात हाय टाईड असेल, त्यामुळे किनारी जाणे टाळा, असं आवाहन प्रशासनाने केलं.
मुंबई पश्चिम उपनगरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे खाली दोन ते अडीच फूट पाणी साठल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तिकडे कल्याणमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल अर्धा तास उशिरा धावत आहेत.समुद्रात सर्वात मोठी भरती, दुपारी 1 वाजून 44 मिनिटांनी 4.90 मीटर उंचीच्या लाटा, गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडा, मुंबई महापालिकेचं आवाहन
मुंबईकरांना रेल्वे प्रवासाचा दुहेरी फटका बसला आहे. हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. रखडलेल्या लोकलमधून उतरून ट्रॅकवरून चालत प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील तर ठाणे स्थानकात पाणी वाढल्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली आहे. कुर्ला स्थानकाजवळील टिळकनगर स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल बऱ्याच काळापासून थांबल्या असून लोकलच्या रांगा लागल्या आहेत. मध्य रेल्वेवर कल्याणहून येणाऱ्या लोकल ठाणे स्थानकातच थांबविण्यात आल्या आहेत. सीएमसटीहून निघाणाऱ्या लोकलही बंद आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकल सुरू होणार नाही’ अशी उद्घोषणाही तातडीने प्रवाशांसाठी करण्यात येत होती. ही उद्घोषणा ऐकल्यामुळे वेळ न दवडता प्रवाशांनी टिळकनगर जवळच गाडीतून उतरत चेंबूर स्थानकाकडे चालणे सुरू केले.
एकीकडे सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला असताना कुर्ला-वडाळा स्थानकांदरम्यान पाणीही साचले आहे
बाळू राऊत प्रतिनिधी