इंदापूर. दि ०३ :- एसटी महामंडळ इंदापूर आगाराचे व्यवस्थापक एम ए मनेरे यांच्या सहकार्याने व नरसिंगपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत नीरा नरसिंगपूर यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष 65 असेल त्यांनाच या शिबिरामध्ये नाव नोंदणी करून फॉर्म भरून घेण्यात आलेनंतर काही दिवसानंतर स्मार्ट कार्ड मोफत चार हजार किलोमीटर आंतर प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहे असे एसटी महामंडळाचे विष्णू डाके यांनी सांगितले कार्यक्रमाचे उदघाटण सरपंच सौ कांचन ताई डिंगरे व उपसरपंच विलास ताटे लक्ष्मीकांत डिंगरे अविनाश दंडवते यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती कमलेश डिंगरे आनंद काकडे श्रीकांत दंडवते सूर्यनारायण दंडवते संतोष मोरे दत्तात्रेय कोळी रविराज काकडे तुकाराम भंडलकर चंद्रकांत सुतार महेश सुतार पांडुरंग शिरसागर यांच्या सहकार्याने व नीरा नरसिंगपूर परिसरातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व लक्ष्मी नरसिंह देवस्थान विश्वस्त उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आली