.बोरघर / माणगांव दि,०३ :- मुसळधार पावसामुळे माणगांव तालुक्यातील बोरघर येथे दरड कोसळून रस्त्यावर आली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.
बोरघर हे गाव माणगांव – खरवली – पेण – बोरघर – उसर तळेगाव मार्गे तळा, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, मुरुड आणि अलिबाग या तालुक्यांना पुर्व पश्चिम दिशेने जोडणा-या मार्गांवर माणगांव तालुक्याच्या पश्चिमेला वसलेले आहे. या मार्गावरुन दररोज अनेक प्रकारची वाहने येजा करत असतात.
संपूर्ण माणगांव तालुक्यासह बोरघर येथे पडणार्या मुसळधार तुफानी पावसामुळे बोरघर गावच्या हद्दीत बोरघर गावालगत असलेला भला मोठा डोंगराचे मोठ मोठ्या झाडा झुडूपांसह प्रचंड मोठ्या मातीच्या ढिगार्यासह रस्त्यावर भूस्खलन झाल्याने हा मार्ग पुर्णपणे ठप्प झाला. सुदैवाने या वेळेत येथे कोणतेही वाहन अर्धा व्यक्ती नसल्याने कोणत्याही प्रकारची वित्त वा जीवीत हानी झालेली नाही.