आष्टी दि, ०३ : -कुठलेच औषध व इंजेक्शन न देता शरीरातील आजारांवर मात करण्यासाठी तालुक्यामध्ये आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने साईनाथ नोबेलस थेरपी सेंटर ३ आॅगस्ट ते १३ आॅगस्ट पर्यंत मोफत उपचार असून मसाज बेड, नऊ बॉल मशीन,अक्युप्रेशर मसाज बेड, टर्मेनीयम मेट, चॅम्पियन बेल्ट, फुट स्पा, हेन्स लेग मसाजर या मशीनच्या साह्याने मनक्याचा त्रास, पाठ व मान दुखी,मुतखडा दमा बी. पी. यांसारख्या अनेक आजारांवरती उपचार केले जातात.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे रूग्णांना हे उपचार मोफत असणार आहेत.मराठी पत्रकार परिषद संलग्न आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने आजपर्यंत विविध शाळेत दर्पण दिन साजरा करून गोरगरीब,अंध,अपंग,अनाथ विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप करणे,आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली तर मंगरुळ येथील कुस्ती खेळाडूंला आशियाई काॅमनवेल्स कुस्ती स्पर्धेला जाण्यासाठी दिड लाख रूपये लोकवर्गणीतून जमा करून दिले तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दरवर्षी नारी सन्मान पुरस्कार देण्यात येतो, दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना लाभ मिळावा म्हणून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने दक्षिण कोरिया या देशाचे आधुनिक तंत्रज्ञान असुन डॉ. विजय गायकवाड यांनी यशोदा नोबेलस थेरपी या नावाने गुजरातमध्ये कंपनी असून रूग्णांना मोफत उपचार करून ते समाज सेवा सोबत वृद्धाश्रम सुद्धा चालवत आहेत.आष्टीमध्ये किनारा चौक नगर रोड आष्टी साईनाथ नोबलेस थेरपी सेंटर हे सुरू केले असून सचिन भैसड,अजय गौड हे येथील थेरपी सेंटर चालवत असून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने होणार्या या थेरपी डेमोचा जास्तीत जास्त रुग्णांनी मोफत उपचारचा लाभ घ्यावा.असे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, सचिव अविशांत कुमकर, यशोदा नोबलेस थेरपीचे चालक डॉ.विजय गायकवाड, साईनाथ नोबलेस थेरपी सेंटरचे चालक सचिन भैसड,अजय गौड व युवा पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव यांनी केले आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी