पुणे, दि.०६ :- पुणे शहरात दुध विक्री करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना भूलथापा मारून फसवणूक करणाऱ्या भामट्यांना पुणे पोलिसांनी केले गजाआड सोन्याचे दागीने लुबाडणा-या भांमटयावर पुणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पुणे शहर पोलिस गुन्हयांचा तपास करीत असतांना युनिट १ चे पो.हवा. योगेश जगताप, पो.ना. मल्लीकार्जुन स्वामी व सुधाकर माने यांना त्यांच्या बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, म्हशीच्या दुधाचा चिक व गावरान तुप विक्री करून फसवणूक करणारे चार इसम इंदापुर रोड बांदलवाडी, गुणवडी, मॅकडॉल कंपनीजवळ, बारामती येथे आले आहेत. युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीच्या ठिकाणी जावून छापा टाकला असता, त्या ठिकाणी सदर गुन्हयातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे नावं १) अशोक उर्फ कांटया
विश्वनाथ गंगावणे, वय २७ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, गुणवडी ग्रामपंचायत, बारामती अॅग्रो शेजारी, ता. बारामती, जि. पुणे २ नवनाथ विष्णू वाईकर,, वय २५ वर्षे, रा. इंदापूर रोड, बांदलवाडी, कॅनल जवळ, ता. बारामती, ज. पुणे ३) लंकेश पोपट वाईकर, वय २२ वर्षे, रा. इंदापूर रोड, बांदलवाडी, कॅनल जवळ, ता. बारामती, जि. पुणे, असे आहे. त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे तपास केला असता, त्यांनी म्हशीच्या दुधाचा चिक व गावरान तुप विक्री करण्याच्या बहाण्याने पुणे शहरातील जेष्ठ महिलांनाची फसवणुक करून सोन्याचे दागीने लुबाडले असे सांगीतले आहे. तसेच जेष्ठ महिलांना तुमच्या गळ्यातील चैन सारखे किंवा मंगळसुत्रा सारखे दागीने माझ्या भावाच्या लग्नात बनवायचे आहेत, माझी आई खाली थांबली आहे तिला दागीने दाखवून आणतो, असे सांगून ते दागीने घेवून मोटार सायकल वरून पळून जात होते. अटक आरोपी क्र. १ ते ३ यांना समर्थ पोलीस ठाणे मध्ये अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर केली आहे. आरोपी क्र. ४) सुनिल सोमनाथ वाईकर, वय ३० वर्षे, रा. विठ्ठलवाडी, बारामती अॅग्रो कंपनीच्या शेजारी, बारामती, पुणे यास दि. ५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी यांचेकडून समर्थ, अलंकार, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड, चिंचवड व निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून त्यांचेकडून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामध्ये अटक आरोपी यांचेकडून .
गुन्हयातील २०४ ग्रॅम सोन्याचे दागीने किं. सहा लाख ५४हजार ९१२रूपये व गुन्हयात वापरलेली चार वाहने त्यामध्ये एक रयल इनफिल्ड बुलेट व तीन होंडा मोटार सायकल कि. तीन लाख ८३ हजार रुपये व तीन मोबाईल हँडसेट वि. ३३, हजार रुपये असा एकुण दहा लाख सत्तर हजार नऊशे बारा रूपये चा माल जप्त केला आहे. आरोपी क्र. १ याच्यावर सन २०१६ मध्ये निगडी पोलीस ठाणे येथे सोने चोरीचे ०२ गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई ही श्री. अशोक मोराळे साो. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. बच्चन सिंह, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे. यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरुण वायकर, पो. उप. निरी. दिनेश पाटील, पो.उप.निरी. उत्तम बुदगुडे, पो उप.निरी. हनुमंत शिंदे, पो.हवा. योगेश जगताप, सुधाकर माने, प्रकाश लोखंडे, अनिल घाडगे, अजय थोरात, मल्लीकार्जुन स्वामी, सुभाष पिंगळे, प्रशांत गायकवाड, अमोल पवार, बाबा चव्हाण, तुषार माळवदकर, रिजवान जिनेडी, संजय बरकडे, श्रीकांत वाघवले, उमेश काटे, इरफान मोमीन, इम्रान शेख, तुषार खडके, सचिन जाधव, अशोक माने, विजेसींग वसावे, कैलास गिरी, यांनी केली आहे.