.बोरघर / माणगाव दि,०६ :-माणगांव तालुक्यातील डोंगरोली बौद्धवाडी येथील शेतकरी दिपक धर्मा जाधव हे ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. शेतावर गेले होते. ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत घरी न आल्यामुळे डोंगरोली बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. परंतु ते रात्रीपर्यंत सापडले नसल्यामुळे परत दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू केले असता सकाळी ७ वा. महादपोली नदीकिनारी एका लाकडाच्या ओंडक्याला त्यांचा मृतदेह अडकलेला आढळून आला. सदरची घटना संजय गायकवाड, अशोक गायकवाड तसेच डोंगरोलीचे सरपंच राणी डोंगरे यांनी माणगांव पोलीस ठाण्यामध्ये जाऊन सांगितले. याबाबत आपत्कालीन निधीतुन आ. अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या कुटूंबाला चार लाख रुपयांचा धनादेश दि. ०६ ऑगस्ट रोजी त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्त केला. आ. अनिकेत तटकरे यांनी माणगांवच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे याना आपत्कालीन निधीद्वारे मदत करण्याचे सांगितले. सदरबाब अतिवृष्टी झाल्याने नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे दिपक जाधव यांच्या मृत्यू झाला, असे संजय गायकवाड यांनी माजी पंचायत समिती सभापती अलका केकाणे व राष्ट्रवादी काँग्रेस माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे यांना सदरचा तरुण हा नदीमध्ये वाहत गेल्याची घटना सांगितल्यावर त्यांच्याकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली. दिपक जाधव यांच्या कुटुंबाला सदरचा धनादेश देत असताना आ. अनिकेत तटकरे यांच्या सोबत माणगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे, इकबाल धनसे, रायगड जिल्ह्याचे माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, डोंगरोली माजी सरपंच संजय गायकवाड, डोंगरोली विद्यमान सरपंच राणी डोंगरे, राजू डोंगरे, राजू मोरे उपस्थित होते.
( विश्वास गायकवाड)