मुंबई दि. ०७ :- भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश एका कणखर, सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्वाला मुकला असून पक्षाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच ना. पंकजाताई मुंडे यांना दुःखावेग आवरता आला नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडे व त्यांनी संघटनात्मक पातळीवर तसेच मंत्री मंडळात एकत्र काम केले होते, आपला व त्यांचा कौटूंबिक स्नेह होता. संसदेत त्यांचा आवाज बुलंद होता. एक कणखर, सुसंस्कृत, अभ्यासू व शालीन असे त्यांचे नेतृत्व होते असे सांगून
‘फुल नही चिंगारी है, ये भारत की नारी है’ हा नारा बदलून ‘फुल भी है चिंगारी है, ये भारत की नारी है’ हा नारा करणा-या आमच्या तेजस्वी नेत्या आम्हाला पोरक करून गेल्या, त्यांच्या निधनाने दुःख आणि वेदना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, ना. पंकजाताई मुंडे हया आपले सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तातडीने दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
बाळू राऊत प्रतिनिधी