पिंपरी, चिंचवड दि,०७ :- पुणे पिंपळे सौदगर शिवसेनेच्या वतीने रहाटणी येथील पवना नगरमधील पूरग्रस्त बाधित कुटुंबांना लहान मुलांचे कपडे ,चादरी तसेच अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.पुणे शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे पवना नदीला पूर आला त्यामुळे तेथील लोक बेघर झाले व त्यांचे रहाटणी शाळेत स्थलांतर करण्यात आले होते व सोमवारी जाऊन पुरग्रस्तांची चौकशी करण्यात आली त्यांची गरज काय आहे याची विचारपूस करून त्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सौ अनिता तुतारे शिवसेना चिंचवड विधानसभा संघटिका कमल गोडांबे पिंपळे सौदगर विभाग संघटिका, मच्छिंद्र देशमुख पिंपळे सौदगर विभाग प्रमुख, चंदन कुंजीर, श्वेता कापसे उप विभाग संघटिका , युवती सेना वंदना खंड़ागळे, अनुपमा उम्रजकर, श्री दुडका उपस्थित होते.