मुंबई : घाटकोपर थोर समाजसुधारक , साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे घाटकोपर येथील कर्मभूमीत स्मारक आजवर बांधून न होणे ही बहुजन समाजाची अवहेलना आहे . सत्ता उपभोगणाऱ्या लोकप्रतिधींनींची स्मारक बनवण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे . हे स्मारक बांधण्यासाठी माझे पूर्ण योगदान असून त्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना स्मारकासाठीचे निवेदन देणार असल्याचे आश्वासन उद्योजक , उत्तर भारतीय समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंह यांनी साठे परिवाराला दिले . लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त अशोक सिंह यांनी शनिवार ( दि 3 ) रोजी दुपारी 2 वाजता घाटकोपर चिरागनगर येथील आण्णाभाऊ साठे यांच्या मुळ निवासस्थळाला भेट देत त्यांना अभिवादन केले व नातेवाईक नामदेव साठे , अनिल साठे , पांडुरंग सकटे यांची भेट घेत स्मारकाबाबत चर्चा केली . यावेळी उद्योजक अशोक सिंह यांचा साठे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधण्यासाठी विलंब होत असल्याने बहुजन समाजाची नाराजी व्यक्त होत आहे . यंदा आण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष असताना सरकार स्मारकासाठी कोणतेच ठोस धोरण हाती घेत नाही . आण्णाभाऊ साठे यांचे त्यांच्या कर्मभूमीत स्मारक हीच आण्णाभाऊ साठेंना खरे अभिवादन ठरणार आहे . आणि या स्मारकामुळे अण्णाभाऊंच्या आठवणीने चिरंतन राहणार आहे . त्या बहुजनांना ऊर्जा देणार आहे . सरकार जर स्मारकासाठी उशीर करत असेल तर स्मारकाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असल्याचे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मारकाबाबत चर्चा करून त्यांना निवदेन देणार असल्याचे अशोक सिंह म्हणाले .
बाळू राऊत प्रतिनिधी