पुणे,दि १५ :- वरखंडा येथील कार्डिनल पिमेंटा आदिवासी हायस्कुल आणि शांतीकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा तर्फे स्वातंत्र्यदिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.वरखंडा चर्चचे प्रमुखधर्मगुरू फादर राजेश रुमाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उठा राष्ट्रवीर हो, मेरे प्यारे वतन, हो जाओ तैयार साथीयो अशा प्रकारच्या देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले. याएकच सक्ती प्लास्टिक मुक्ती, एक मूल
एक झाड, मुलगी शिकली प्रगती झाली यांसारख्या प्रबोधनपर घोषणा देण्यात आल्या. शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबतची शपथ शाळेतील सहशिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थ, तसेच पालकांना दिली. ग्रामसभेत त्याबाबत ठराव घेण्याविषयी सूचित केले. काही दिवसांपूर्वी दापचरीयेथे भर रस्त्यात आंब्याचे मोठे झाड पडून बंद झालेला रस्ता तातडीने पूर्ववत करण्यासाठी व रस्त्यात पडलेले झाड तोडण्यासाठी मदतीला धावून येणारे प्राथमिकचे पालक प्र रमेश हाडळ तसेच त्यांच्या सोबतीला शाळेतील विद्यार्थी गणेश टोकरे, अजय टोकरे व संतोष घुलम यांचा शाळेचे मुख्याध्यापक संतोष पागी तसेच मुख्याध्यापिका सिस्टर जुली यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सहशिक्षक यांनी बच्चू मेढा स्वातंत्र्यदिनानिमित्त थोरांचे आचरण व बोध या विषयावर उद्बोधक विचार व्यक्त केले. धर्मगुरू आदर राजेश रुमाव यांनी मुलांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मुलांचे प्रबोधन केले.सह शिक्षिका प्रियांका डोंगरे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीसदस्यांना रोपटी देऊन सन्मानित करण्यात आले.
देशप्रेमा सोबत बंधुप्रेमाची भर घालणारा रक्षाबंधनाचा सण शाळेतर्फे आगळ्यावेगळ्या थाटात पार पडला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील सर्व वर्गबंधूंना ओवाळून राखी बांधली. दरवर्षी तलासरी येथील वीर सावरकर रक्तदाता संघातर्फे अध्यक्ष संतोष पिंगळे व दत्तात्रय शिंदे यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच तहसील कार्यालय पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन याठिकाणी रक्षाबंधन करण्यासाठी मोफत राख्यांची व्यवस्था केली जाते. यंदा ध्वजारोहणानंतर शाळेतर्फे तलासरी पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय येथील सर्व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी तहसीलदार मा. स्वाती घोंगडे, पोलीस निरीक्षक अजय वसावे तसेच नायब तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, अधिकारी व
कर्मचारी यांनी शाळेच्या या सातत्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन सन्मानित केले. त्यानंतर भाजी आणल्यानंतर घरात इकडे तिकडे पडून तसेच कचऱ्यात भर घालणाऱ्या पिशव्या शाळेतर्फे मुलांकडून गोळा करून त्या पुन्हा वापरासाठी तलासरी नाक्यावरील आदिवासी गरीब भाजीविक्रेत्या महिलांना त्या पुन्हा वापरासाठीमोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.याही उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.