पुणे दि १५ :- पुणे शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध विभाग,व क्षेत्रिय कार्यालयात कार्यक्रम आयोजन, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय कडील प्रभाग क्रमांक ११ मधील सुतारदरा आरोग्य कोठी अंतर्गत सुतारदरा भागात ‘स्वातंत्र्य दिना निमित्त’
‘कचऱ्यापासून स्वातंत्र्य’ हि activity केली गेली.
या भागात असणाऱ्या ‘जिज्ञासा लर्निंग सेंटर’ या शाळेतील मुले- पालक आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालय’ मधील महा.सहा.आयुक्त श्री.शिशिर बहुलीकर, तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक व सेवक, स्वच्छ संस्थेचे सुपरवायझर व कचरा वेचक यांनी एकत्र येऊन ‘रस्त्यावर कचरा टाकण्याचे दुष्परिणाम’ या विषयी ‘पथ नाट्य’ सादर करून कचऱ्याविषयी ‘जन जागृती’ करण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी ध्वजारोहणा नंतर ‘कचरा सेवकांचा’ सुका मेवा देऊन जिज्ञासातल्या मुलांच्या हस्ते कौतुक सोहळा केला गेला. अत्यंत घाणीत हात घालत स्वत:चे स्वाथ्य धोक्यात घालुन हि मंडळी आपला परिसर स्वच्छ ठेवतात. त्यांच्या बद्दल या द्वारे कृतज्ञता व्यक्त केली गेली.
हातात फलक घेऊन संपूर्ण सुतारदरा भागात प्रभात फेरी निघाली आणि चौका चौकात थांबून पालक आणि मुले यांनी मिळून सात वेळा पथ नाट्य सादर केले पुणे महापालिका आणि स्वच्छसंस्थेचे कचरा वेचक ढकल गाडी घेऊन घरोघरी जाऊन कचरा गोळा करूनही इथली लोकं रस्त्यावरच कचरा फेकताना आढळतात. दंड करूनही लोकांचा कल कचरा फेकण्याकडे दिसू येतोय आणि त्या विषयी जास्तीत जास्त जागृती’ निर्माण व्हावी म्हणून आता जिज्ञासाचे पालक आणि मुले यांनी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय सोबत पुढाकार घेऊन हि मोहीम हाती घेतली आहे.
यात जिज्ञासा शाळेतल्या मुलांसोबत लीना पाध्ये, अलूरकर अशोक, अमृता तिळवे, मनिष मुळे, अशी पालक मंडळी आणि कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय कडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री राम सोनवणे , आरोग्य निरीक्षक श्री. संतोष ताटकर, गणेश साठे, मोकादम वैजिनाथ गायकवाड, अमित अवघडे उपस्थित होते