पुणे, दि.१६ : -स्वातंत्रदिन व राखी पौर्णिमेचे औचित्य साधून कार्डिनल पिमेंट हायस्कूल आणि शांतिकुमार विद्यामांदिर येथील विद्यार्थीनिनी पोलीस उपनिरीक्षक नावकर, पोलीस निरीक्षक अजय वसावेंसह पोलीस कर्मचाऱ्यांना ओवाळून, कुंकूम तिलक लावून त्यांना राख्या बांधल्या.
धर्म गुरू फादर राजेश रुमाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यांत आले. यावेळी मुख्याध्यापक संतोष पागी, मुख्याध्यापिका सिस्टर जुली, विद्यार्थी प्रिय शिक्षक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी विध्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते सादर केली तसेच एकच सक्ती प्लास्टिक मुक्ती, मुलगी शिकली प्रगती झाली या सारख्या प्रबोधनपर घोषणा दिल्या.
दत्तात्रय शिंदे यांनी बालकांचे हक्क व सुरक्षित जीवन या विषयावर उपस्थिताना शपथ दिली. संकटकाळी धावून येणारे विदार्थाचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. संतोष पिंगळे, पागी यांनी मोफत राख्या पुरविल्या. पोलिस उपनिरीक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.