नासिक दि १६ ::-छावा क्रांतीवीर सेना, गरीबरथ ढोलपथक, लक्ष्मीविजय वरदलक्ष्मी लाॅन्स, वक्रतुंड केटरर्स, आदेश कलेक्शन, श्रीदत्त मंदिर देवस्थान नासिक, इडू कॉईन फाऊंडेशन,साप्ताहिक न्यूज मसाला यांच्याकडून संयुक्तपणे कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना खालीलप्रमाणे वस्तूरूपी मदत देण्यात आली.१००० नग झाडू,१००० नग फिनेल बाॅटल,१००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, २५० नग साड्या,१०० नग सोलापूरी चादर,१५ बिस्कीट बाॅक्स ,१००० किलो तांदूळ-गहू,१०० नग तेल पॅकेज,१००० सॅनिटरी नॅपकिन,पॅकेट विविध प्रकारची औषधे,विविध प्रकारचा किराणा,व रोख स्वरूपात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने ५१ हजार रुपये.
स्वरूपात व सदर मदत कोल्हापूर येथे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली, यावेळी नासिक मनपा स्थायी समिती सभापती उद्धव निमसे,छावा क्रातिवीर सेना प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, छावा क्रांतिवीर सेना नेवासा तालुका अध्यक्ष व मराठा टायगर छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले,छावा क्रांतीवीर विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे सर, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजाराम शिंदे,महेश पाटील,अमोल जगळे ,भास्कर दिंडे, दशरथ दिंडे,दिनकर कांडेकर निवृत्ती इंगोले,अनिल भालेराव,निवृत्ती शिंदे ,हरिभाऊ बोडके,रवी भांभरगे, विशाल तुपे,पप्पू बोधक,पूजा ताई धुमाळ, अरुणा ताई डुकरे,शकुंतला ताई कापडणीस,लक्ष्मी ताई वाघ,वंदना ताई शिलावट,नूतन ताई शिरसाठ,छाया ताई नाडे,आदी उपस्थित होते.