नीरा नरसिंहपूर दि,२२:- गणेश वाडी तालुका इंदापूर या ठिकाणी श्रीकृष्ण गोकुळाष्टमी निमित्त अखंड हरिनाम गाथा पारायण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त ह-भ-प श्री राम अभंग महाराज यांची कीर्तन सेवा झाली कीर्तन शेवे निमित्त अभंग महाराज पुढे म्हणाले की कीर्तनकार महाराजांचा किर्तनाचा भाव वाढला म्हणजे अंतःकरणाचा भाव कमी झाला किर्तनाचा भाव दोन तासाला कीर्तन सेवेसाठी 40 ते 50 हजार रुपयांची मागणी केली जाते हे बरोबर नाही लोकांची घरे जाळून समाधान करण्या पेक्षा देतील त्यात समाधान मानले पाहिजे पैशाने परमार्थाची किंमत करायची नसते गरिबांच्या माणुसकीने दिले तेवढ्यातच समाधान मानले पाहिजे
एखाद्या महिलेला दीडशे रुपये साठी दिवसभर शेतात राब राब राबावे लागते तरच पैशाची किंमत कळते दोन तासाच्या सेवेसाठी एवढी रक्कम घेतली म्हणजे परमार्थ नाही जास्त पैसे घेणाऱ्या महाराजाला उसात काचोळा काढायला लावले पाहिजे असे सांगितले तर चुकीचे ठरणार नाही हरिनाम सप्ताहासाठी परिसरातील पिंपरी गोंदी सराटी नर. शिहपुर गिरवी ओझरे गणेशवाडी शिंदे वस्ती या भागातील सर्व भाविक भक्त उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आली मृदंग वादक महेश सुतार सतीश घोगरे वीणेकरी ज्ञानदेव घोगरे सप्ताहाची पाचवी कीर्तन सेवा अभंग महाराज यांच्या कीर्तनाने संपन्न झाली परिसरातील भाविक मंडळी व भक्तगण बापूसाहेब शिंदे पंढरीनाथ शिंदे गजानन डांगे तुकाराम घोगरे नामदेव घोगरे शशिकांत निंबाळकर शरद बोडके महेश सुतार बाळासाहेब सुतार सर्व भाविक भक्त उपस्थित राहून सप्ताहाची पाचवी कीर्तन सेवा संपन्न झाली
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार