मुंबई दि,२६ : – सुबक अशी प्रतिकृती छत्रपती आवटे दादा यांच्या संकल्पनेतून यावेळी मुंबईतील श्री सिद्धिविनायक चित्र शाळेत सेल्फी पॉईंट युद्ध स्थळ बंकरची सुबक अशी प्रतिकृती बनविली आहे. ही प्रतिकृती बनवण्याकरिता प्रधान सचिव मितेशभाई, रोहित कांबळे, मंगेश मस्तुद, प्रभाकर चव्हाण यांनी देखील मदत केली. भारत पाक राजा नावाची व भारताचा नकाशा असलेली सुबक छानशी अशी रांगोळीची प्रतिकृती नेव्हीच्या श्री रंगावली संस्कार जोपासना ग्रुप इंडियन नेव्ही यांनी बनवलेली आहे.
आयोजक जम्मू काश्मीर ईशर दिदी आणि मुंबईतून छत्रपती दादा आवटे
भारत पाक सीमा रेषेवरील (LOC) पुछँ या गावी भारतीय आर्मी ब्रिगेड ४ मराठा रेजिमेंट व ईशर दिदी मानवाधिकार कार्यकर्ता कार्याध्यक्ष प्रोग्रेसिव्ह नेशन्स एन. जी.ओ. तथा प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदिर ट्रस्ट उपाध्यक्षा जिल्हा पुछं जम्मू काश्मीर व छत्रपती दादा आवटे प्रोग्रेसिव्ह नेशन्स एन. जी.ओ. किंग ऑफ़ (LOC) पुन्हा एकदा ४ त्या वेळेस मुंबईहून इंडियन नेव्ही बेस मेन गेट एल.बी.एस मार्ग घाटकोपर विद्याविहार. मार्गावरील श्री सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत ही देखणी मूर्ती दिव्यांग मूर्तीकार विक्रांत पांढरे यांनी बनविली आहे.
भारत पाक बॉर्डरच्या राजा (King of LOC) राजाचा प्रवास*
भारत पाक बॉर्डरच्या राजा (King of LOC) जम्मू काश्मीरला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 26 ऑगस्ट 2019 ला बांद्रा टर्मिनस वरुण स्वराज एक्स्प्रेसने रवाना होणार आहे. मुंबई ते जम्मू काश्मीर 2000 किलोमीटरचे अंतर पार करून 27 ऑगस्ट 2019 ला सायंकाळी स्वराज एक्स्प्रेसने जम्मू रेल्वे स्टेशन येथे पोहोचेल तेथे पुछं जिल्ह्यातील गणेश भक्त मोठ्या धुमधडाक्यात गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असणार आहेत जम्मू रेल्वे स्टेशनवरुण गणपती बाप्पाची मूर्ती ट्रक मधून 300 किलोमीटर दूर असलेल्या बर्फाळ प्रदेशातील डोंगराळ दुर्गम भागातील रस्त्याने भारत पाक सीमेवरील (LOC) स्थित पुछं येथे घेऊन जाणार आहेत. आणि भारत पाक सीमेवर पुछं येथील पुलस्व नदीच्या तटावर गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.
*यज्ञ व महाप्रसादाने वातावरण तल्लीन होऊन जाते*
गणपतीची स्थापना झाल्यानंतर असंख्य लष्करातील सैनिक दर्शन आणि मनोमनी गणपतीची सेवा करण्यास येतात. प्रथम येणार्या रविवारी सकाळी मोठ्या यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यावेळी असे वाटते की पुछं येथे ऋषी मुनींच्या मंत्रोच्चाराने पूर्ण वातावरण पवित्र होऊन जाते.पुछं या जिल्ह्यात सर्व गणेश भक्तानी वातावरण उजळून निघते आणि महाप्रसादात गणेश भक्त सामील होतात.
२०१६ गणेशोत्सवात महाप्रसादावेळी अतिरेक्यांनी केला हमला परंतु ईशर दिदी यांचे पुतणे शहीद राजेंद्र कुमार शर्माजी ( CID जम्मू काश्मीर) यांच्या प्राणाची आहुती अभिजित पेंढारकर काश्मीर पोलीस व सैनिक यांच्या जॉइन्ट ऑपरेशन करून 4 अतिरेक्यांना ठार मारले
परंतु २०१६ गणेशोत्सवात महाप्रसादावेळी अतिरेक्यांनी हमला केला होता. त्यावेळी आतिरेकी गणपती मंडपाच्या शेजारी पोहोचले होते पण त्यांचा हा मनसुबा योग्यवेळी मानव अधिकार कार्यकर्त्या ईशर दिदी यांचे पुतणे शहीद राजेंद्र कुमार शर्माजी ( CID जम्मू काश्मीर ) यांनी आपल्या जिवाची बाजी लाऊन उधळून लावला. त्यामुळे असंख्य जवानांचे प्राण वाचले. त्याच दिवशी रविवारी सकाळपासून अतिरेक्यां बरोबर जवानाची चकमक सुरू होती. त्यावेळी प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्टच्या सहकार्यांनी ग्राउंड झिरोवर (युद्धस्थळ ) सैनिकांसाठी महाप्रसाद नेला हे ऑपरेशन सिव्हील एरिया असल्याने तेथील लोकांचे सैनिकां प्रति असलेले प्रेम सन्मान पाहून सैनिकांनी महाप्रसाद स्विकार केला. दिवस रात्र चालणारे बॉम्बस्फोट गोळीबार यामुळे आजूबाजूच्या घरांना व जमिनीला भेगा पडल्या होत्या. हे ऑपरेशन 3 दिवस (72 ) तास टीव्ही चॅनेलवर लाईव्ह चालू होते. पण आम्हाला आमच्या गणपती बाप्पा व सैनिकांवर पूर्ण विश्वास होता. व शेवटी ब्रिगेडियर अभिजित पेंढारकर यांच्या नेतृत्वाखालील जम्मू, काश्मीर पोलीस व सैनिक यांच्या जॉइन्ट ऑपरेशन करून 4 अतिरेक्यांना ठार मारले.
गणपती बाप्पाचे दैनंदिन कार्यक्रम
गणपती बाप्पाची स्थापना जम्मू काश्मीर मधील पुछं जिल्ह्यात बर्फाळ वातावरणात होते. एवढ्या थंड वातावरणात पहाटे चार वाजता बाप्पाची पूजा आरती केली जाते. सायंकाळी चार वाजता स्थानिक महिला व लहान मुले संगीत भजनाचा कार्यक्रम करतात. सायंकाळी सात वाजता सैनिकांच्या उपस्थितीत महा आरती केली जाते. अनंत चतुर्थीच्या दिवशी पुछं जिल्ह्यातील शेर ए काश्मीर पुलाजवळील पुलस्थ नदीत( king of LOC) भारत पाक बोर्डारच्या राजाचे विसर्जन केले जाते.
सद्यस्थिती नदीच्या जवळ व आजूबाजू च्या परिसरात बॉर्डर वर गोळीबार चालू आहे असल्या कारणाने तिथे संचारबंदी (curfew) आदेश जारी करण्यात आला आहे. अश्या परिस्थितीत प्रशासकीय आदेशानुसार हा उत्सव शांततेत पार पाडला जाणार आहे. आमच्या परिवाराने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे त्यामुळे सैनिक आणि त्याच्या परिवाराच्या भावना आम्ही समजू शकतो. आपल्या सैनिकाचे आत्मबल व प्रोत्साहन वाढविण्यासाठी असे उपक्रम आम्ही करत राहू आणि यावर्षी King of LOC भारत पाक बॉर्डरच्या राजाला जम्मू काश्मीरला सुखरूप घेऊन जाणार असे ईशर दिदी यांनी सांगितले
गणपती उत्सव साजरा करण्याचा उद्देश
हा उत्सव साजरा करण्यामागील उद्देश असा आहे की दिवस रात्र सीमेवर डोळ्यात तेल घालुन देशाची सुरक्षा करणारे आपले भारतीय सैनिक आपल्या घरी कोणताही सण उत्सव साजरा करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यांना हा गणेशोत्सव आपला समजून पूर्ण भक्ति भावाने आनंदाने या उत्सवात सहभागी होतात संपूर्ण भारतीयांना सुरक्षित ठेवणारे व रोज तणावपूर्ण वातावरणात असणारे आपले भारतीय सैनिकांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते. गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला.याच विचाराने प्रेरित होऊन होऊन मानव अधिकार कार्यकर्त्या ईशर दिदी यांनी स्वतःला या कार्यासाठी समर्पित केले आहे. जेणे करून सीमा भागातील जनतेमध्ये एकता, समता, बंधुभाव, निर्माण व्हावा. व आपल्या सैनिकाचे मनोबल वाढावे या कार्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडून कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत घेतली जात नाही. हा संपूर्ण खर्च ईशर दिदी व पुछं गावी स्थायिक त्याचा परिवार करतो. या कामी मुंबईतील स्थानिक सहकारी प्रोग्रेसिव्ह नेशन्स (NGO) चे अध्यक्ष व शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक छत्रपती आवटे दादा यांचे मोलाचे सहकार्य असते.
बाळू राऊत प्रतिनिधी