पुणे,दि २६ :- पुणे शहरात पावसाने थैमान काही दिवसापूर्वी घातले होते,व पुणे शहरात जुने वाडे, झोपड्या, काही बांधकामे पावसामुळे ढासळले होते व पुणे महापालिकेच्या वतीने काही वाड्यांना नोटीस देऊन धोकादायक बांधकाम पाडण्यात येत होते. या परिस्थितीचा गैरफायदा काही घरमालक घेऊन काही जुन्या वाड्यांचे मालक, पुणे महापालिका अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण
वाडा.पाडण्याच्या आगोदरचे फोटो
हातमिळवणी करून वाड्यातील भाडेकरूंना रस्त्यावर आणायचे काँट्रॅकट घेत आहेत की काय ? अशी परिस्थिती पुण्यातील ७९१ बुधवार पेठ परिसरात पाहण्यास मिळाली आहे बुधवार पेठेतील नामदेव शिंपी मंदिराशेजारील एका जुन्या वाड्याची बाहेरील बाजूस असलेली, अगोदरच अर्धवट पडलेली भिंत काही दिवसांपूर्वी कोसळली.होती त्या वाड्यात पूर्णवेळ राहण्यास कोणीही नाही,तळ तळमजल्यावर एक व्यापाऱ्यांचे दुकान होते मात्र या भिंतीचा राडारोडा काढण्यास गेलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यास जीवाची भीती घालून बाहेर काढले. आणि हा वाडा रिकामा करण्याच्या उद्देशाने गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून राहणाऱ्या भाडेकराला दिनांक २ ऑगस्ट २०१९ रोजी कोणतीही नोटीस किंवा कल्पना न देता त्यांचे सर्व सामान बाहेर काढले ज्यामध्ये काही मौल्यवान वस्तू, व दागिने हि होते. एका भिंतीसाठी पूर्ण वाडा पाडण्याचे आणि भाडेकरूंना हाकलून लावून रस्त्यावर आणायचे षड्यंत्र वाडामालकाने अधिकार्याबरोबर रचल्याचा आरोप हि भाडेकरू व्यापारी दयामाया दास यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.