नीरा नरसिंहपूर दि २६ :- नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथील चैतन्य विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद तुळजापूर येथील बाळकृष्ण वेंकट राव कदम यांच्या मार्गदर्शनाने तीर्थाच्या ठिकाणी श्रावण मास निमित्त अन्नदान सेवा केली जाते परंतु चालू वर्षी लक्ष्मी नरसिंह देवस्थान यांच्या पावन भूमीमध्ये चैतन्य विद्यालयामध्ये अन्नदान सेवा करण्यात आली विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत अण्णा दंडवते कमलेश काका डिंगरे डॉक्टर सिद्धार्थ सरवदे सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित राहून बाळकृष्ण महाराजांनी दिलेला महाप्रसादाचा आस्वाद घेतला सालाबाद प्रमाणे यंदाही 600 ते 700 विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांना अन्नदान सेवा करण्यात आली याबद्दल चैतन्य विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दंडवते मुख्याध्यापक दुनाकेसर कमलेश काका व त्यांचे सहकारी यांनी अन्नदाते बाळकृष्ण कदम महाराज यांचे स्वागत व आभार मानले अन्नदानासाठी सहकार्य करणारे डॉक्टर शहाजी राहुल बागल भीमराव शिंदे डॉक्टर सिद्धार्थ सरवदे व सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी