पुणे दि २७:-पुणे शहरात दि २६ ऑगस्ट रोजी मा.उपमहापौर डॉ. श्री सिद्धार्थ धेंडे यांच्या वाढदिवसा निम्मत प्रभाग क्रमांक ०२ नागपूर चाळ आरोग्य कोठी अंतर्गत महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कर्यक्रमास मा.उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, मुख्य उद्यान
अधीक्षक श्री घोरपडे साहेब, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री संजय घावटे,आरोग्य निरीक्षक स्वप्नील कुताळ,मोकादंम सतीश कांबळे ,आरोग्य कोठीचे कर्मचारी,उद्यान विभाग कर्मचारी, परिसरातील नागरिक,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्ष रोपण केलेले वृक्ष हे आरोग्य कोठीच्या कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या कायम स्वरुपी संवर्धनाची जबाबदारी हि स्वीकारली आहे मा.उपमहापौर यांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व व स्वछ सर्वेक्षण २०२० बाबत माहिती देऊन स्वछता,आरोग्य, कचरा वर्गीकरण प्लास्टीक पिशव्याचा वापर न करता कापडी पिशव्याचा वापर करणे व येणाऱ्या गणेशोत्सवकाळात शाडू मातीच्या गणेश मूर्तींचावापर करावा प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींचा वापर करू नये उत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य प्रभागातील नागरिकांनी व गणेश मंडळांनी नदी मध्ये न टाकता महापालिकेच्या महाराष्ट्र हौसिंग बोर्ड बायोगॅस प्लांट येथे स्वतःहून आणून देण्याबाबत प्रबोधन केले