पुणे,दि २७ :- पुणे लष्कर पाणीपुरवठा पंपींग वरील लष्कर ते ठाकरसीपर्यंत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीचे गळती सुरु झाल्याने तातडीने दुरुस्तीकरिता बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवार दि. २९/८/२०१९ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. बंडगार्डन विभागाकडील काही भागात पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. विश्रांतवाडी, प्रतिकनगर, पंचशीलनगर, शांतीनगर, फुलेनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, सोपाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी गावठाण, रामवाडी, साईकृपा सोसायटी, खडक कामगार, ब्रम्हा सनसिटी, सैनिकवाडी, लक्ष्मीनगर, नवी खडकी, आंबेडकर सोसायटी परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. वरीलप्रमाणे दुरुस्तीविषयक कामे सायंकाळी पूर्ण झालेनंतर सदर भागाचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येईल.