पुणे,दि २८ :- पुणे शहर खडक पोलिसांनी सराईत गुन्हेगारा कडून वाहन चोरीचे ३ मोटारसायकल जप्त केले आहे व आरोपी, पापा जाधव, व त्याचा मित्र साहिल शेख, (दोघं रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी पांढर्या रंगाची ऍव्हिएटर मोटारसायकल चोरली होती.व खडक पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी धोबी घाट, शंकरशेट रोड येथे सापळा रचून पो.कॉ रवी लोखंडे व पो.कॉ विशाल जाधव यांनी आरोपीस ताब्यात घेतले. आहे व अधिक तपास करता दोघांनी दोन ऍक्टीव्हा मोटारसायकल चोरल्या होत्या. त्यांच्याकडून एकूण ३ मोटारसायकल हस्तगत केल्या असून. आरोपींचा पुर्व इतिहास पाहता, आरोपी सुरज ऊर्फ पापा रमेश जाधव याच्यावर खडक पोलीस स्टेशन येथे घरफोडी, वाहनचोरी व इतर चोरीचे व साहिल ऊर्फ मुन्ना मुनावर शेख याचेवर खडक पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, घरफोडी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, फरासखाना विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, तपास भरारी पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, रवी लोखंडे, राहुल धोत्रे, विशाल जाधव, प्रमोद नेवसे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, इम्रान नदाफ, रोहन खैरे यांच्या पथकाने केली.