बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोकणातील सर्वात मोठा उत्सव समजला जाणारा गणपती उत्सव जवळ आला असताना माणगाव पुणे रोड ची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. रस्त्यात सर्वत्र पडलेले खड्डे आणि त्यामुळे रस्त्याची ही अवस्थापाहून विळे वरचीवाडी गावातील तरुणांनी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. व रस्त्यावरील पडलेले खड्डे भरण्याचा संकल्प केला. माणगांव तालुक्यातील निजामपूर एमआयडीसी परीसरात असलेल्या पोस्को कंपनीच्या अवजड वाहनांमुळे माणगाव पुणे रस्त्याची पूर्णतः वाताहत झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत . या रस्त्यावर वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच चालवावे लागत आहे. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी काही तरुणांनी एक अभिनव संकल्प केला.
विळे वरचीवाडी येथील तरुण योगेश कोकाटे, आनंद जाधव, मंगेश शेलार व ओंकार नलावडे यांनी यंत्रसामग्री तयार करून महेश सुतार ,केतन कोदे, मंगेश सारदल , शाम तवटे, विजय नांदवीलकर, दिलीप म्हाप्रलकर, सोपान वरवटकर, अखतर चौधरी , पवन कुमार, सचिन सारदल, आदेश ताम्हणकर, अथर्व तवटे, महेश ताम्हणकर, इम्तियाज यासर्व तरुणांना सोबत घेऊन गौरींगणपती सण जवळ आल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत पार पडावी व कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये हे लक्ष ठेऊन विळे येथील वरचीवाडी गावातील तरुणांनी खड्डे भरून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे ह्या सर्व तरुणांचे केलेल्या कामामुळे या परिसरातून कौतुक होत आहे.
विश्वास गायकवाड. प्रतिनिधी :- बोरघर, माणगांव, रायगड