बँकिंग क्षेत्रात काम करताना अनेक माणस, त्यांचे स्वभाव अगदी जवळून पाहिले. अशातीलच मला भावलेले व गरीबांचे तारणहार पुरुषोत्तम कराडकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.कर्मचारी कोणत्याही श्रेणीतील असो ज्याला मदतीची गरज आहे तिथे ते उपस्थित असत. केवळ बघ्याची भूमिका न घेता ते मदतीचा हात नेहमीच पुढे करीत असत. संघ परिवाराच्या संस्कारक्षम मुशीत त्यांची लहानपणा पासून जडणघडन झाली होती.1985 सालामधील एक प्रसंग मला अजूनही आठवतो. बँकेतील एक शिपाई सावकारीपाशात अडकला होता. सावकारांना व्याज देण्यात त्या कर्मचाऱ्याचा पगार संपून जात असे. संसार चालविण्यासाठी पुनः कर्ज हे चक्र सुरूच होते. ही गोष्ट कराडकर यांना कळली त्यावेळी त्यानी त्या कर्मचऱ्याशी संपर्क साधून स्वताच्या नावे सोसायटीतून कर्ज काढून त्या कर्मचाऱ्याची कर्जफेड केली. पुढे 3 वर्षे किराणा, मुलांची फी, कपडेलत्ते सार पाहून त्याला कर्जमुक्त केले. आज त्या कर्मचाऱ्याची मुले उच्च शिक्षित असून झोपडपट्टीतुन स्वतःच्या सदनिकेत रहात आहेत. ह्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. कितीतरी संसार त्यानी सावरले आहेत.बचत, गुंतवणूक या विषयातही त्यांचे अंदाज बरोबर आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. संघटना वाढिसाठी त्यांचे योगदान हे मोलाचे ठरले आहे.
विनायक साने, लेखक हे मुक्त पत्रकार