मुंबई :झी थिएटर चा डोम या मराठी सामाजिक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलर लाँच करण्यासाठी डॉ.विलास उजवणे, अंजली उजवणे, संजय शेजवळ , दिग्दर्शक प्रदीप दळवी आणि निर्माते प्रि. आर एल तांबे आणि रोहनदीप सिंह उपस्थित होते. आणि विशेष अतिथि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोंसले उपस्थित होते।
सह्याद्री पिक्चर्स आणि जम्पिंग टोमॅटो मार्केटींग प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली डोम प्रो.आर. एल तांबे आणि रोहनदीप सिंग यांनी तयार केले आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रदीप दळवी यांनी केले आहे. सतीश साळवे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत.संदीप डांगे यांनी संगीत व पार्श्व संगीत दिले आहेत, तर गीत लेखन प्रि.आर एल तांबे आणि विठ्ठल वाघ. राज कडूर (अन्ना) यांचे छायाचित्रण आणि संकलन सचिन नाटेकर यांनी केले.प्रशांत नाईक यांनी ही फाईट चे काम पहिले आहे आणि निकी बत्रा कोरिओग्राफर आहेत . या चित्रपाटत डॉ विलास उजवणे,अंजली उजवणे, मोहन जोशी, ज्योती निसळ , आर एल तांबे , अनिता नाईक, संजय शेजवळ , दिप्ती धोत्रे, मयुरी कापडाणे, सुनील गोडबोले, मेघा घाडगे, प्रदीप पटवर्धन, अविनाश जाधव, गीतांजलि कुलकर्णी , सतीश साळवे, निर्मला, बाळ कलाकार विनायक दळवी, श्रेया सुर्वे, तीर्था निंबाळकर, अनुष्का शिंदे ,श्रुती पोळ आणि प्रदीप दळवी या सर्वाणि मुख्य भूमिका निभावली आहे .‘डोम’ म्हणजे एक स्मशानभूमीत मजूर म्हणून काम करतो आणि मृत व्यकितचा त्यांचा नातेवाईकॉम बरोबर अंतिमसंस्कार करण्यास मदद करतो आणि . त्यांची रोजची भाकरी पूर्णपणे या कामावर अवलंबून असते. परंतु त्यांची नवीन पिढी या परंपरेला पुढे नेण्यास नकार देते. या मधील जुन्या पिढी आणि नवीन पिढी यांच्यातील संघर्ष सुरु होतो .महाराष्ट्राचातिल गोरेगाव फिल्म सिटी (मुंबई), कोल्हापूर आणि वजेश्वरी ( नांदणी ) , डहाणू अशा अनेक ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे . हा चित्रपट २७ डिसेंबर, २०१९ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी सांगितले की हा चित्रपट एक सामाजिक नाटक आहे. या जुन्या पिढी आणि नवीन पिढी यांच्यातील संघर्ष चित्रपटा मध्ये दर्शविला गेला आहे. तसेच या चित्रपटात एक त्रिकोणी प्रेमकथा पहावयास मिळेल तसेच हि कथा काल्पनिक आहें। या चित्रपटात सर्व कलाकार उत्कृष्ट काम केले आहे. हा एक सामाजिक विषय असल्याने हा चित्रपट विविध चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी मुुंबई