टेंभुर्णी दि १२ :- (प्रतिनिधी ) टेंभुर्णी येथील सागर भागवत राजगुरू हे टेंभुर्णी येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण इयत्ता 12 वी पर्यंत झालेले आहे. ते अनुसूचित (SC) जातीचे असुन त्यांचे वडील भागवत भिमराव राजगुरु हे शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी संचलित जनता विद्यालय मध्ये प्रयोग शाळा सहाय्यक या पदावर नोकरीत होते.26 सप्टेंबर 2008 रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यांचे निधनानंतर त्यांचा मुलगा सागर राजगुरु यांनी अनुकंपतत्वावर प्रयोगशाळा सहाय्यक अथवा शिपाई या पदावर कामावर घेण्यासंबधी 2008 व 2009 साली शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी व शिक्षणधिकारी (माध्य) जिल्हा परिषद सोलापुर यांचे कडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिक्षणधिकारी यांनी जनता विद्यालय टेंभुर्णी यांना या विषयी राजगुरु यांना कामावर रुजु करण्याचे पत्र दिले होते. परंतु 2008 ते 2019 पर्यंत
आजतगायत गेली 11 वर्षापासुन शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी व मुख्याध्यापक जनता विद्यालय यांनी सागर राजगुरु यांनी वरील मागणी केलेले पदावर फ़क्त ते मागास वर्गीय असल्याने त्यांना जातीय भेदभाव करुन कामावर घेतलेले नाही व गेली 11 वर्षापासुन त्यांना त्यांचे हक्कपासुन वंचित ठेवले असल्याची तक्रार व 18 डिसेंबर 2019 पासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात सह कुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याची नोटीस पंतप्रधान यांना पाठविली असल्याची माहिती सागर राजगुरु यांनी दिली आहे. सन 2008 पासुन ते सन 2019 पर्यंत राजगुरु हे नोकरीसाठी पाठपुरावा करीत आहे व वारंवार वरिष्ठांना पत्र पाठवुन या विषयी त्यांनी तक्रार नोंदवली आहे,त्यांचे तक्रारीचे अनुषंगाने शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणधिकारी(माध्य.) जि.प यांनी शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी यांना विविध पत्राद्वारे राजगुरु यांना कामावर रुजु करुन घेण्यासाठी सुचित केले होते.परंतु वरिष्ठांच्या आदेशाला शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी व मुख्याध्यापक जनता विद्यालय यांनी आज पर्यंत वरिष्ठांच्या पत्राचे उत्तर ही दिले नाही व राजगुरु यांना कामावर देखील रुजु करुन घेतलेले नाही.सदर प्रकरणी शिक्षणाधिकारी यांनी जनता प्रशाला येथील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन रोकण्यात येईल असे प्रकारचे पत्र देखील दिले होते,तसेच शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी हे सागर राजगुरु हे अनुसूचित (SC) जातीचे असल्याने शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी हे राजगुरू यांच्याशी जातीवाद करून त्यांना त्यांचे हक्कापासून वंचित ठेवत असल्याचे गंभीर आरोप शिक्षणाधिकारी यांनी केले असल्याचे तक्रारी अर्जात नमूद आहे.2008 साली सागर राजगुरु यांनी प्रयोगशाळा सहायक पदी किंवा शिपाई पदी अनुकंपतत्वावर कामावर घेण्याची मागणी केली असताना देखील जनता विद्यालयाचे विश्वस्तांनी 2013 साली शिपाई भरतीची जागा रिक्त असल्याची दैनिक मध्ये जाहिरात दिली,परंतु सागर राजगुरु यांना कामावर रुजू करून घेतले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सागर राजगुरु हे अनुकंपतत्वावर नोकरीस पात्र असताना देखील जनता विद्यालयाचे विश्वस्तांनी त्यांना कामावर घेतले नाही परंतू जनता विद्यालयाचे सर्वच विश्वस्तांचे अनेक जवळचे नातेवाईकांना कामावर घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे व त्याची चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी व जनता विद्यालय टेंभुर्णी यांनी राजगुरु हे अनुसूचित (SC) जातीचे असल्याने गेली 11 वर्षापासुन त्यांना त्यांचे हक्कापासूनवंचित ठेवले असल्याने तसेच जाणून बुजून गेली 11 वर्षापासुन अनुकंतत्वावर त्यांना कामावर रुजु करुन न घेता त्यांच्यावर व त्यांचे कुटुंबियांवरती अन्याय केले असल्याने या सर्व अन्याय विरुध्द जनता विद्यालय टेंभुर्णीचे सर्व विश्वस्तांवर्ती कायदेशीर व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे न्याय मागणीसाठी 18 डिसेंम्बर 2019 रोजी पासुन नागपुर येथील हिवाळी अधिवेशन काळात नागपुर विधान भवन समोर आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचे निवेदन प्रधान सचिव (शिक्षण विभाग) यांना दिली आहे व त्याची प्रति पंतप्रधान,मुख्यमंत्री,मुख्यसचिव शिक्षण संचालक,शिक्षण उपसंचालक शिक्षण आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. .
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी