टेंभुर्णी दि ०२ :- प्रतिनिधी शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी चुलीचा वापर करण्यात येत होता.यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना धुराचा त्रास होत असे.हा त्रास वाचविण्यासाठी व शाळा धूरमुक्त करण्यासाठी टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या वतीने विशेष निधी गोळा करून गॅस टाकीचे व शेगडीचे शहरातील पाच ही शाळेत वाटप करण्यात आले.ही योजना जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे व सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली आहे असे सरपंच प्रमोद कुटे यांनी गॅस टाकी व शेगडीचे वितरण करताना सांगितले.पहिल्या टप्प्यात टेंभुर्णी नं-१ शाळा,लोंढे वस्ती शाळा,मुलींची शाळा,खुळे वस्ती शाळा वेश व धनाजी कुटे वस्ती शाळा या शाळांचा समावेश करण्यात आला आहे.या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, तिसऱ्या आघाडीचे रामभाऊ शिंदे,गौतम चव्हाण,ग्रा.प,गणेश केचे,सोमनाथ साळुंके, शैलेश ओहोळ, टेंभुर्णी शहर काॕग्रेस चे अध्यक्ष सोमनाथ कदम,रावसाहेब खडके,भिल गुरुजी, माजी शिवसेना शहरप्रमुख किशोर नाळे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार रघुनाथ बनसोडे,उषा थोरात,अशोक वाघावकर,विजया क्षिरसागर,संगिता पारखे,सुनंदा तळेकर हे शिक्षक उपस्थित होते.प्रास्ताविक केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांनी केले तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे यांनी केले.तर चौबे मॅडम यांनी आभार मानले.
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल जगताप