पुणे दि ०९ : -सेव्ह मेरिट सेव नेशन या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय रन फॉर मेरिट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील 30 शहरात एकाच वेळी हा उपक्रम राबवण्यात आला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो ते सावरकर स्मारक डेक्कन या मार्गावर सकाळी 7 वाजता रन फॉर मेरीट ची सुरुवात झाली खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी महिला व्यापारी अशा एकूण 700 ते 800 लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांनी सांगितले की राज्यात सुरू असलेले अत्याधिक आरक्षण धोरण हे खुल्या प्रवर्गातील गुणवंतांच्या मुळावर उठले आहे त्याविरोधात रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई सेव मेरिट सेव नेशन लढत आहे आरक्षण धोरणाचा पुनर्विचार होऊन हळूहळू आरक्षण कमी व्हायला हवे व शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा खरा लाभ मिळायला हवा परंतु आज असे होत नाही.
संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री विवेकानंद पाठक यांनी सांगितले की खुल्या प्रवर्गातील तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या मनात मोठी भीती आहे चांगले गुण मिळवून देखील त्यांना शिक्षणात नोकरीत जागा मिळत नाही त्यामुळे नाईलाजास्तव बऱ्याच लोकांना परदेशात जावे लागले आहे आपल्या देशातील गुणवत्ता आपल्याच देशात टिकून राहावी यासाठी प्रयत्न करणे हे खरे राष्ट्रकार्य आहे व सेव मेरीट सेव नेशन यासाठी कटिबद्ध आहे. याप्रसंगी संस्थेचे डॉ सुश्रुत शहा, डॉ अर्चना चिंचवडकर, डॉ रेणुका धुर्वे, श्री संजय गांधी, श्री प्रशांत कौसडीकर, श्री जयंत गौरकर, श्री मदन सिन्नरकर, डॉ अर्चना अग्रवाल, श्री महेंद्र लुनिया, श्री धीरज ओस्तवाल, श्री अमित कवी, श्री ऋषिकेश सुमंत, श्री शिवप्रसाद मुळे, श्री अजय पोतदार श्री सागर देशपांडे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.