श्रीगोंदा दि ११:- प्रतिनिधी ,श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील अल्पवयीन मागासवर्गीय मुलीला तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या गणेश संतोष ढवळे वय २२ वर्ष याने जबरदस्तीने गाडीवर बसवुन निर्जन स्थळी नेऊन लग्नाचे अमिष दाखवून,छेडछाड करून विनयभंग केल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पॉक्सो सह ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल करण्यात आला.श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रहिवाशी असलेल्या गणेश ढवळे याने गेल्या १ वर्षापासून घरा शेजारी राहणाऱ्या ९वी मधील मुलीशी लगट करून सलगी करण्याचा प्रयत्न करीत होता. तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडते, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे असे म्हणत वारंवार छेडाछेडी करत असे तसेच या प्रकरणी घरच्यांना कळवल्यास जीव देईल अशी धमकी मुलीला त्याने दिली.
हे प्रकरण घरच्यांना समजल्यास सर्वांची बदनामी होईल. त्यामुळे पीडित मुलींने प्रकरण दाबून, त्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाचे छेडछाडी करणे थांबविले नाही. उलट त्याने १० फेब्रुवारी रोजी पिडीत मुलगी शाळेत जाण्यास निघाली असता तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घार गाव परिसरात नेऊन, तिच्याशी झटापटी करीत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून पीडित मुलीने घरच्यांना झालेली घटना सांगितली. त्यानुसार मुलीच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गणेश ढवळे याचे वर बालकांचे लैंगिक अधिनियम, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी : योगेश चंदन