पिंपरी चिंचवड दि ११ :-कार चोरणा-या आंतरराज्य टोळीकडून 12 कार, 15 कार इंजिन जप्त; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई व २ कोटी १९ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत – इन्शुरन्स कंपनीकडून भंगारमध्ये कार घ्यायच्या, त्याच मॉडेलच्या कार दुसऱ्या राज्यातून चोरून आणायच्या. चोरून आणलेल्या कारला भंगारमधील कारचे इंजिन नंबर आणि आरटीओ पासिंग नंबर बदलून त्याची विक्री करायची आणि रग्गड पैसा कमवायचा असा या टोळीचा उद्योग होता. अशा आंतरराज्य टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 12 कार, 15 कार इंजिन जप्त केली. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने केली आहे.
दि २४ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट १ कडील सपोनि गणेश पाटील , पोउनि काळुराम लांडगे , तसेच कर्मचारी प्रमोद लांडे , मनोजकुमार कमले , अमित गायकवाड , सचिन मोरे, वाहनचोरीच्या अनुशंगाने चिखली पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करीत असताना सपोनि गणेश पाटील व पो . शि . सचिन मोरे, यांना गोपनीय माहिती मिळाली की , शक्ती भक्ती चौक ते मुकाई चौक रोडवर गणेशनगर रावेत या ठिकाणी एका पंजाबी इसमाचे गॅरेज असुन त्याचे गॅरेजमध्ये चारचाकी गाड्यांचे अनेक इंजिन व सुट्टे पार्ट मोठ्या प्रमाणात असुन दोन चारचाकी गाड्या उभ्या आहेत त्या चोरीच्या असाव्यात असे वाटते . अशी माहिती मिळताच पिंपरी चिंचवड , गुन्हे शाखा , युनिट १ अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीची शहानिशा करून दोन दिवस वॉच ठेवून दि २६ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , सपोनि गणेश पाटील व वरील स्टाफ यांनी रावत येथील गॅरेजवर दि २६जानेवारी २०२० रोजी छापा टाकुन गॅरेजमध्ये असलेला गॅरेजचा मालक चनप्रित हरविंदरपाल सिंह , वय ४३ वर्षे , रा . एस . बी . पाटील रोड , रावेत , पुणे , यांस ताब्यात घेतले . त्यानंतर गॅरेजची पाहणी केली असता गॅरेजमध्ये इनोव्हा , स्वीफ्ट अशा दोन चारचाकी गाड्या मिळुन आल्या . तसेच गाड्यांचे सुट्टे पार्ट व अनेक इंजिन दिसुन आले . मिळुन आलेल्या इनोव्हा गाडीवर महाराष्ट्र पासिंगचा नंबर होता परंतु त्यांचे इंजिन नंबरवरून खात्री करता सदरची गाडी ही पंजाब राज्यातील असल्याची निष्पन्न झाले . तसेच स्वीफ्ट गाडीवरही असलेला नंबर खोटा असल्याचे आढळुन आले . त्यामुळे सदरच्या गाड्या त्यांनी चोरून आणुन त्यांचे चेसीस व इंजिन नंबरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाल्याने त्यांचे विरूध्द देहुरोड पोलीस ठाणात गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करून त्यांची १३ दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली . कस्टडी दरम्यान तपास करता आरोपी चनप्रित हरविंदरपाल सिंह व त्याचा साथीदार असे दोघांचे भागीदारीमध्ये रावेत येथे गॅरेज असुन ते इन्शुरंन्स कंपनीकडुन अॅक्सीडेंट मध्ये नुकसान झालेल्या चारचाकी गाड्या कागदपत्रासह विकत घेवुन विकत घेतलेल्या गाडीच्या मॉडेलची व रंगाची चारचाकी गाडी पंजाब , हरीयाणा , दिल्ली व इतर राज्यातुन चोरी करून आणुन त्यागाडीवर अॅक्सीडेंन्ट झालेल्या गाडीचा चेसीस नंबर असलेला भाग लावुन गाडीची पुन्हा विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे . अशाच प्रकारे आरोपी यांनी चोरीच्या गाड्यांना अॅक्सीडेंन्ट झालेल्या गाडीचा चेसीस नंबर लावुन १० ते१८ लाख रूपये पर्यात ते विकत होते . विक्री केलेल्या एकुण चारचाकी १२ गाड्या त्यामध्ये इनोव्हा ४ , फोर्युनर १ , मारूती स्वीफ्ट १ , ह्युदाई वेरना २ , मारूती इर्टीगा १ , मारूती आल्टो १ , फोक्सवैगन पोलो १ , मारूती रिट्स १ अशा जप्त करण्यात आल्या आहेत . आरोपीचे रावेत व कोंढवा येथील गोडाऊन मधुन इन्शुरन्स कंपनीकडुन अॅक्सीडेंट मध्ये नुकसान झालेल्या चारचाकी गाड्यांचे १३ इंजिन व पंजाब , दिल्ली येथुन चोरीस गेलेल्या चारचाकी गाड्यांचे २ इंजिन जप्त करण्यात आले आहेत . आरोपीकडून एकुण २ कोटी १९ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . सदर गाड्या पुणे शहर , नवी मुंबई , नागपुर , गोवा , सातारा , अहमदनगर , पिंपरी चिंचवड , आळेफाटा भागातुन जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त माला बाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे . १ ) मटौर पो . स्टे . , जि . सासनगर , चंदिगढ येथे गु . रजि . नं . १३४ / २०१९ भादवि कलम ३७९ – इनोव्हा २ ) डिवीजन नं . २ . पो . स्टे . लुधियाना , पंजाब गु . रजि . नं . ४४ / २०१९ भादवि कलम ३७९ – इनोव्हा ३ ) डिवीजन नं . ७ , पो . स्टे . लुधियाना , पंजाब गु . रजि . नं . ५२ / २०१९ भादवि कलम ३७९ – इनोव्हा ४ ) चांदणीबाग पोलीस ठाणे , जि . पाणीपत , हरीयाणा गु . रजि . नं . ९०९ / २०१९ भादवि कलम ३७९ – फोर्म्युनर ५ ) किंर्तीनगर पोलीस ठाणे , दिल्ली गु . रजि . नं . २४१७५ / २०१८ भादवि कलम ३७९ – इनोव्हा ६ ) लुधियाना डिवीजन नंबर ७ पोलीस ठाणे , पंजाब गु . रजि . नं . २०२ / २०१९ भा . दं . वि कलम ३७९ इनोव्हा
आरोपी चनप्रित हरविंदरपाल सिंह हा पंजाब पोलीसांचे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचेवर अशाच प्रकारचे एकुण चारचाकी गाड्या चोरीचे १० गुन्हे दाखल आहे . आरोपी मुळचा पंजाब राज्यातील रहीवाशी असुन तो सध्या दिल्ली व पुणे येथे राहणेस आहे . आरोपी हा पंजाब , हरीयाणा व इतर राज्यातून गाडी चोरी करून ती चालवत पुणे येथे येवुन साथीदाराकडे गाडी सोडून परत जाताना विमानाने जात असे व दुसरी गाडी घेवुन येत असल्याचे निष्पन्न झाले . आरोपीस अटक केले पासुन त्याचा साथीदार फरार झाला आहे . आणखी काही गाड्या हस्तगत होण्याची शक्यता आहे . सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री संदीप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त श्री सुधिर हिरेमठ , सहायक पोलीस आयुक्त श्री . आर . आर . पाटील , श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे , सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील , पोलीस उप निरीक्षक , काळुराम लांडगे , तसेच युनिट कडील कर्मचारी रविंद्र राठोड , रविंद्र गावंडे , प्रमोद लांडे , बाळु कोकाटे , मनोजकुमार कमले , अमित गायकवाड , मारूती जायभाये , अंजनराव सोडगिर , महेंद्र तातळे , सचिन मोरे , सुनिल चौधरी , प्रमोद हिरळकर , प्रमोद प्रमोद गर्जे , विजय मोरे , गणेश सावंत , तानाजी पानसरे यांनी केली आहे . व अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील , गुन्हे शाखा , युनिट १ , पिंपरी चिंचवड हे करीत आहे .