नीरा नरसिंहपूर: दि ,१२ :- प्रतिनिधी दुबई येथे दि.9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत ” दुबई साखर परिषद 2000 ” दि.9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत दुबई सिटी येथे उत्साहात पार पडली. झालेल्या जागतिक साखर परिषदेत साखर उद्योगातील आव्हाने व संधी यावर सविस्तरपणे सकारात्मक अशी चर्चा करण्यात आली.या साखर परिषदेमध्ये राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन(इस्मा) दिल्लीच्या तसेच इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालिका कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतला.
या साखर परिषदेचे अल खलीज शुगरचे व्यवस्थापकीय संचालक व प्रधान भागधारक जमाल अल घुराईर आणि एमेटर्राचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जेकाॅब रॉबिन्स यांनी आयोजन केले.प्रत्येकी चार वर्षांनी या साखर परिषदेचे आयोजन केले जाते.
या साखर परिषदेत जगामध्ये साखरेची मागणी व उपलब्धता यासह साखर उद्योगांसमोरील समस्या, संधी व आव्हाने, साखरेचे कमी-अधिक होणारे दर, विपणन आदी विषयांवरती चर्चा करण्यात आली.तसेच भारत देशातील साखर उद्योगापुढील असलेल्या प्रमुख आव्हानांसंदर्भात व त्यावरती कोणत्या उपाययोजना करता येतील यासंदर्भातही ऊहापोह करण्यात आला.तसेच जागतिक स्तरावरती साखर उद्योगाने आव्हानांना कसे सामोरे जावे या व इतर विषयांवरही जागतिक साखर उद्योगातील तज्ञांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तज्ञ मान्यवरांनी साखर उद्योगासमोरील अडचणी संदर्भात अभ्यासपूर्ण मते व्यक्त केली,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
जगातील प्रमुख साखर उत्पादक देश, शुद्धीकरण करणारे, आयातदार, व्यापारी, औद्योगिक वापरकर्ते, वित्तीय संस्था, विश्लेषक, शिपिंग कंपन्या आणि सेवा पुरवठा करणारे एकत्र येऊन भविष्यातील कृती करण्यासाठी दुबई साखर परिषदेमुळे एकत्र आले आहेत, हे साखर परिषदेचे यश आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योगातील सर्व प्रमुख मान्यवर व निर्यातदारांना एकत्र आणण्यासाठी या साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येकी चार वर्षांनी होणाऱ्या या दुबई शुगर कॉन्फरन्स 2020 ने उपस्थितांना नवीन दृष्टीकोन,महत्त्वपूर्ण संधी आणि अमूल्य नेटवर्किंग व कनेक्शन प्रदान केले,अशी माहिती कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार