मुंबई दि २१ :- ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्..तसेच बम बम भोलेच्या गजरात सगळीकडे शिव मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोग मोठया तन्मयतेने शिवाची पूजा अर्चा करण्यात तल्लीन होत होते. आज घाटकोपर मधील सगळयाच मंदिरात रांगा पाहण्यास मिळाल्या पारशीवाडी येथे कालेश्वर महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक , शिव जप , शिव पुराण पठनाचे कार्यक्रम आहे .तसेच तिथे फराळाचे वाटप देखील करण्यात आले त्याच बरोबर येथे एक गो शाळा आहे, या गो शाळेत देखील लोकांनी गाईचे दर्शन घेतले. आणि चारा खाऊ घातला पारशीवाडीतील पीमलेश्वर महादेव मंदिर ,शंकर शंभू मंदिर, पवई येथील तूगरेश्वर महादेव मंदिरात, असल्पा येथील महेश्वर मंदिर , मोहाली विलेज येथील मौहलेश्वर पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
खैरानी रोडवरील प्राचीन जंगलेश्वर शिव मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्यात्याच बरोबर येथे शिवअमृत लीला पठन आणि मंत्र जप पंडित करत आहेत .शिवाचे प्रसिध्द भांग येथे भाविकांना प्रसाद म्हणून मिळतो .या ठिकाणी मंदिराचा खूप मोठा हॉल आहे .आणि गरीब जनतेला कमी खर्चा मध्ये लग्नासाठी उपलब्द्ध करून दिला जातो .
मुंबई मधील सुप्रसिध्द असे घाटकोपर मधील सुर्वोदय हॉस्पिटल मधील 72 फूट शिवाची मूर्ती विराजमान आहे .आणि त्यांच्या जटामधून अखंड अशी गंगा वाहते .विट्ठल रुख्मीनी चे भव्य आसे मंदिर आहे आणि असंख्य भाविकांची येथे गर्दी होते .म्हणून प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराकडे पहिले जाते .या मंदिरात जैन संस्क्रुतीचा देखील अनोखा संगम पाहण्यास मिळतो ती म्हणजे सर्वात मोठी महावीर जैन मूर्ती ,त्याच बरोबर येथे मराठी संंस्क्रुति चे देखील दर्शन होते संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ , संत जनाबाई , संत बहिणाबाई, गुजराती संक्रुतिचे देखील दर्शन होते संत जलाराम , संत मोरारी बापू , संत खेतर पालजी , श्रीकृष्णाच्या 105 मूर्ती येथे आहेत , तिरुपती बालाजी , साई बाबा , नागवर विराजमान श्रीकृष्ण, कमळाच्या आकाराचे मंदिरात देखील असंख्य मूर्ती आहेत .बारा ज्योतिर्लिंग ,दूर्गाचे अनेक अवतार देखील आहेत .आज सगळीकडे महाशिवरात्री निमित्त शिवमंदीरात भाविकांनी गर्दी केली आहे.अनेक रुग्णांना एक मायेचा आधार देवदेवतांच्या सान्निध्यात गेल्यामुळे मीळत असतो आणि त्यामुळे त्याचा आजार कोठे पळून जातो हे त्यांना देखील समजत नाही त्यांच्या मनाला खूप असे समाधान मिळते .
मुंबईतल्या बाबूलनाथ या प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईतलं हे अत्यंत प्राचीन आणि उंच शिवमंदिर आहे. इथल्या टेकडीवर बाभळीचे झाड होते आणि त्यावरून बाबूलनाथ असं नाव पडलं. अशी आख्यायिका आहे. या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती या बाराव्या शतकातील म्हणजे राजा भीमदेवच्या काळातील आहेत. असं सांगितलं जातं
अंबरनाथ शहरातील ९५८ वर्ष अशा अतिप्राचीन शिवमंदिरातही रात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांची मोठी गर्द्दी पाहायला मिळतेय. महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठी जत्रा भरते. अंबरनाथचे शिवमंदिर हे हेमाडपंथी असून शिलाहार राजा मुम्बानी यानं ९५८ वर्षा पूर्वी बांधल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे युनोस्कोनं जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. मध्यरात्री १२ वाजता शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता अंबरनाथ पालिकेने भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केली आहे.
आख्यायिका
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरिणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणून लागली- “मला मार पण इतराना सोडून दे.” हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते
मुुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत