पाटोदा दि २२ :- शिवशंकर को जिसने पुजा उसका भी उध्दार हुआ अंतकाल के भवसागर मे उसका बेडा पार हुआ… पाटोद्यातील नगरेश्वराच्या पावन भुमीत महान पर्व शिवरात्रीनिमित्त सर्व झुजांर नारी मंचाच्या सदस्यांनी या सामुहिक शिवलीलामृत पारायण व शिवभजन सोहळ्याचे आयोजन केले होते. या सामुहिक पारायण सोहळ्यात सर्व महीलांनी मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने सहभागी होऊन पवित्र शिवलीलामृत
पारायण सोहळ्याचा लाभ घेतला व सुमधुर शिवभजन गायले. या सोहळ्यात सौ. सत्यभाभाताई बांगर, सौ. चित्रा कुलकर्णी, सौ. कीर्ती टेपाळे, सौ.मयुरी बांगर,सौ।अरुणा श्रोते, सौ. औटीताई, सौ. श्मामल हरी, ललिता धसे,सौ.अलका नागरगोजे, सौ. शालिनी शिंदे,सौ. मेघा राऊत इ महीलांनी पारायण सोहळ्यात सहभाग घेतला.हा पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी व सोहळ्यात सहभागी महीलांच्या सेवेसाठी सौ.शितल धसे,सौ. सुरेखा खडके सौ. रत्नाताई बांगर, सौ. अनिता बांगर इ सदस्यांनी विशेष सहकार्य केले. झुजांर नारी मंचाच्या सर्व सदस्यांनी सोहळ्यातील महीलांना व भाविकांना फराळ, फलाहार, शितपेयाचं, व चहापाणी यांची उत्तम सेवा दीली.शेवटी सर्व सहभागी महीलांचे आभार झुजांर नारी मंचाच्या अध्यक्ष सौ. संध्या टेकाळे व उपाध्यक्ष सौ. राधा देशमुख व सौ. गंगा देशमुख सौ. विजयाताई जायभाये यांनी आभार मानले.पारायण सोहळ्याची सांगता महाआरती व शिवस्तुतीने झाली.